Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

'कदंब पठाराला युनिफॉर्म एफएसआय द्यावा'

विश्वजीत राणेंचं वक्तव्य; पालिकांनी स्वत:चे मास्टरप्लान तयार करण्याचंही आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी शहराला नैसर्गिक वाढीवर मर्यादा आहेत. शहर वाढीसाठी कदंब पठार हा अत्यंत उपयुक्त भाग आहे, जिथे पणजीची पुढील वाढ होऊ शकते. माझे वडील मुख्यमंत्री असताना या पठारावरून रस्ता तयार केला. पुढे मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यावर या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे या भागात युनिफॉर्म एफएसआय देणे आवश्यक आहे असे वक्तव्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केलं आहे. गोमन्तकला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर सडेतोड भाष्य केलं.

पणजी शहरात महापालिकेपेक्षा नगर नियोजन आणि विकास प्राधिकरणाला अधिक अधिकार आहेत. यासाठी महापालिकेसह सर्व पालिकानी स्वतःचे मास्टर प्लान तयार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांचा विकास सुनियोजित होणार नाही. यासाठी अनुभवी आणि जाणकार तज्ज्ञांचा मदत घेणे गरजेचे आहे. तसे निर्देश मी महापालिका आणि पालिका प्रशासनाला दिले आहेत. असेही राणे म्हणाले.

दरम्यान गोव्यातील काँग्रेस नेतृत्वावर नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी थेट निशाणा साधला आहे. गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. आज आहेत ते उद्या कुठे जाणार, हे माहीत नाही. जे नेते झाले आहेत त्यांना तीन महिने देखील अजून झालेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची मनःस्थिती चांगली नाही, अशा शब्दात विश्वजीत राणेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देखील नवे आहेत त्यांच्यापाशी कोणतीही विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT