Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

OffCourse, विश्वजीत राणेच मुख्यमंत्रीपदासाठी योग्य; विजय सरदेसाईंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

निती आयोगाची आकडेवारी चुकीची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच म्हटलं होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या वक्तव्याचाही सरदेसाईंनी पुरता समाचार घेतला आहे.

आदित्य जोशी

Vishwajit Rane as Goa CM : विश्वजीत राणे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य असल्याचं वक्तव्य गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी केलं आहे. सरदेसाईंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात मात्र भुवया उंचावल्या आहेत. निती आयोगाची आकडेवारी चुकीची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नुकतंच म्हटलं होतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या वक्तव्याचाही सरदेसाईंनी पुरता समाचार घेतला आहे. गोव्याचा मुख्यमंत्री बदलण्याची गरज असून विश्वजीत राणे निश्चितच या पदासाठी योग्य असल्याचं सरदेसाईंनी म्हटलं आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत निती आयोगाने दिलेली आकडेवारी खोटी म्हणून आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्यात 1 लाखांहून अधिक बेरोजगार असल्याची आकडेवारी ही सांख्यिकी खात्याने तयार केलेली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी एवढंही माहित नसणं हे दुर्दैव असल्याचा टोला सरदेसाईंनी लगावलाय. मुख्यमंत्री केवळ सगळं आपल्या हातात यावं यासाठी आग्रही असतात. मात्र सर्वसामान्य गोवेकरांच्या प्रश्नांचं त्यांना काहीही पडलेलं नाही. गोव्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला 20 हजार तरुणांनी नोंदणी केली आणि तेवढेच गोव्यात बेरोजगार आहेत, हा मुख्यमंत्र्यांचा तर्क चुकीचा असून त्यांनी वक्तव्य करण्याआधी माहिती घ्यावी असा सूचक सल्लाही विजय सरदेसाईंनी दिला आहे.

दरम्यान गोव्यात सत्ताबदलाची गरज असून बरेचजण मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक आहेत, असा दावाही सरदेसाईंनी केला आहे. गोव्यात मुख्यमंत्री मनमानी करत असून त्यांना कुणीही याबाबत विचारणा करण्यास तयार नाही. मात्र गोव्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले असून संधी मिळाल्यास विश्वजीत राणे, दिगंबर कामत हे दोघेही या पदावर दावा करु शकतात असंही सरदेसाईंनी सांगितलं आहे.

विश्वजीत राणे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य म्हणत असतानाच सरदेसाईंनी त्यांच्यावरही चांगलीच टीका केली आहे. राणेंना रिजनल प्लानिंग म्हणजे जमत नसल्याचं खुद्द निती आयोगच सांगतो. मात्र प्रमोद सावंत यांच्यापेक्षा विश्वजीत राणे मुखमंत्रीपदासाठी योग्य असल्याचं सरदेसाईंचं म्हणणं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'पासपोर्ट नको, तुम्ही आमचे भाऊ' भारतीय बाईकरला अफगाणिस्तानात थेट प्रवेश! बॉर्डरवरील दृश्याचा व्हिडिओ व्हायरल

Amitabh Bachchan: जन्मापूर्वीच झालेली भविष्यवाणी! हरिवंशराय बच्चन का म्हणायचे 'अमिताभ'ला वडिलांचा पुनर्जन्म?

Sai Sudharsan Catch: अविश्वसनीय! साई सुदर्शनने घेतला क्रिकेट इतिहासातील 'खतरनाक ' कॅच, Video पाहून थक्क व्हाल

NH 66 Closure: उन्नत मार्गासाठी पर्वरी ते घुरीये रस्ता 3 तासांसाठी बंद! सोमवारी घेणार 'ट्रायल रन'; पर्यायी मार्ग कोणते?

Sanguem: माकडाच्या उड्येन, कशें कोसाळ्ळें सिलिंग? Watch Video

SCROLL FOR NEXT