Vishwajit Rane addressing the crowd at the "Women in Power" at Usgao Dainik Gomantak
गोवा

Women In Power : महिलांच्या उत्कर्षासाठी सरकार कटिबद्ध : मंत्री विश्‍वजीत राणे

उसगावात महिला मेळावा उत्साहात, महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी योजना

दैनिक गोमन्तक डिजिटल

महिलांच्या उत्कर्षासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून महिला आणि बाल कल्याण खात्यातर्फे गोमंतकीय महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी व्याजविरहीत अनेक योजना उपलब्ध करण्यात येत असल्याचे महिला आणि बाल विकास खात्याचे मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

उसगावात आज रविवारी खात्यातर्फे आयोजित भव्य महिला मेळाव्यात विश्‍वजीत राणे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खात्याच्या संचालक दीपाली नाईक, उपसंचालक ज्योती देसाई, जिल्हा पंचायत सदस्य उमाकांत गावडे, उसगाव - गांजे सरपंच नरेंद्र गावकर तसेच महिला पंच व इतर सदस्य उपस्थित होते.

मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, महिलांचा सरकारच्या सर्व उपक्रमांना पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. उसगाव पंचायत क्षेत्रातील नागरिकांचा माझ्यावर विश्वास आहे त्यामुळेच मोठ्या संख्येने महिला वर्ग या मेळाव्याला उपस्थित आहेत. हे प्रेम व विश्वास कायम ठेवा, असे आवाहन राणे यांनी केले.

विशेष म्हणजे वाळपई भागाचा जसा विकास होत आहे, तसाच उसगावचाही विकास होईल, अशी ग्वाही राणे यांनी दिली.

स्वागत व प्रास्ताविक खात्याच्या संचालक दीपाली नाईक यांनी केले. सरकारच्या विविध योजनांबद्दल यावेळी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्यात आले. व्यासपीठावरील इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. महिलांच्या मोठ्या उपस्थितीत हा मेळावा यशस्वी झाला.

महिलांसाठी व्याजविरहीत कर्ज !

मंत्री विश्‍वजीत राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी महिलांच्या उत्कर्षासाठी मोठे प्रयत्न चालवले आहेत. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आत्मनिर्भर झाल्या तर आपला देश प्रगतीपथावर जाऊ शकतो, म्हणून त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

त्याच धर्तीवर आपल्या राज्यातही महिलांसाठी अनेक योजना आणि उपक्रम राबवले जात असून आता व्याजविरहीत कर्ज उपलब्ध करून महिलांना पुढे आणण्यासाठी महिला आणि बाल विकास खात्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT