Codar IIT Project Dainik Gomantak
गोवा

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Goa IIT Project: कोडार - बेतोडा येथील आयआयटीला प्रखर विरोध होऊ लागला असून आप, आरजी या राजकीय पक्षांनंतर आता काँग्रेस पक्षानेही आयआयटी विरोधी आंदोलनात उडी घेतली आहे.

Sameer Panditrao

फोंडा: कोडार - बेतोडा येथील आयआयटीला प्रखर विरोध होऊ लागला असून आप, आरजी या राजकीय पक्षांनंतर आता काँग्रेस पक्षानेही आयआयटी विरोधी आंदोलनात उडी घेतली आहे. गुरुवारी काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी कोडारला भेट दिली, त्यावेळेला काँग्रेस पक्ष कोडारवासीयांसोबत ठामपणे उभा राहणार असून लोकसभेत लोकांचा आवाज पोचवू असे दक्षिण गोव्याचे खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी तेथील लोकांना आश्वासन दिले.

यावेळी काँग्रेसचे हळदोणेचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा, माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, फोंड्याचे काँग्रेसचे नेते राजेश वेरेकर व इतर कार्यकर्ते स्थानिक नागरिक ज्ञानेश्र्वर खांडेपारकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी या परिसराची पाहणी केली. निसर्गाने नटलेल्या या गावावर सरकार मुद्दामहून प्रकल्प लादून येथील नैसर्गिक संपत्ती नष्ट करू पाहात असल्याने भाजप सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.

खासदार विरियातो फर्नांडिस म्हणाले, की कोडारसारख्या निसर्गाने नटलेल्या प्रदेशाची ओळख कायम राखून इतरांना ती पटवून देण्याची गरज आहे. लोकांची रोजीरोटी नष्ट करून काँक्रिटची जंगले उभारणाऱ्या सरकारला ठाम विरोध करताना भाजप सरकारला जबर अद्दल घडविण्याची गरज आहे.

हा प्रश्न आपण लोकसभेत उपस्थित करणार असून काँग्रेस पक्ष कोडारवासीयांसोबत ठामपणे उभी राहील. राजेश वेरेकर, मनिषा उसगावकर व इतरांनीही आपला पाठिंबा दर्शवून एकजूट कायम राखण्यासंबंधी आवाहन केले.

‘गोवा विकायला काढलाय’

भाजपवाल्यांनी गोवा विकायला काढला आहे. गोवा एकदम लहान राज्य असून गोमंतकीयच आता बाहेरचे होणार आहेत. दिल्लीत गोव्याच्या जमिनीचा लिलाव सुरू असून समृद्ध गोव्याची भाजप सरकारने पूर्णतः वाट लावली असल्याचा आरोप खासदार विरियातो फर्नांडिस यांनी केला.

‘सरकारचे हे दुटप्पी धोरण’

आमदार ॲड. कार्लुस फेरेरा म्हणाले, की लोकांची रोजीरोटी हिरावून बिल्डर लॉबीला दरवाजे उघडे करण्याचा हा प्रकार आहे. सरकारचे हे दुटप्पी धोरण काँग्रेस पक्ष कधीही सफल होऊ देणार नाही. काँग्रेस पक्ष ठामपणे लोकांसोबत राहणार आहे. गिरीश चोडणकर म्हणाले, की राजकारणी लोक सर्वसामान्यांच्या हिताशी खेळत आहेत. पंच सदस्य ते आमदारांपर्यंतच्या स्थानिक राजकारण्यांचा स्थानिकांना पाठिंबा नाही यावरून सरकारची खेळी काय आहे ते समजावे. कोडारवासीयांना काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sreesanth: "भज्जीनं थप्पड कांड विकलं!" श्रीसंतचा हरभजन सिंहवर कोट्यवधींच्या कमाईचा आरोप; क्रिकेट जगतात खळबळ

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

Budh Gochar 2026: "धनाचा पाऊस अन् सुखाची बरसात!" 30 एप्रिलपासून 5 राशींची होणार चांदी; बुधाच्या गोचरमुळे चमकणार भाग्य

IPL 2026 Points Table: "आरसीबीचा 'विराट' विजय!" गुजरातला नमवून गुणतालिकेत पटकावलं दुसरं स्थान; प्ले-ऑफच्या दिशेनं आगेकूच

लग्नावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात पती-पत्नीसह 5 जणांचा मृत्यू; एका निष्पाप प्राण्यानेही गमावला जीव

SCROLL FOR NEXT