Codar IIT Project: 'गावात आयआयटी नकोच'! गावडेंचा कोडारवासीयांना पाठिंबा; विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याची दिली माहिती

Goa IIT Project: कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला विरोध वाढत असतानाच आता प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी कोडार गावाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
Govind Gaude
Govind GaudeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कोडार-बेतोडा येथील नियोजित आयआयटी प्रकल्पाला विरोध वाढत असतानाच आता प्रियोळ मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनी कोडार गावाला भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दोन दिवसांपूर्वी कोडारवासीयांनी आमदार गोविंद गावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी आयआयटीसंबंधी चर्चा केली होती. गोविंद गावडे यांनी कोडारवासीयांना पाठिंबा देताना हा विषय आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत नेणार असल्याचे सांगितले.

कोडार-बेतोडा गाव हा निसर्गसंपन्न असून येथील शेतीबागायतीवरच लोक गुजराण करतात. या गावाची नैसर्गिक समृद्धी अबाधित ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या ग्रामस्थांचा विषय आपण सरकार दरबारी लावून धरू, असेही गोविंद गावडे म्हणाले.

Govind Gaude
Codar IIT Project: ‘आयआयटी’ प्रकल्प नकोच! कोडार ग्रामस्थ भूमिकेवर ठाम; CM सावंतांसोबत होणार चर्चा

यावेळी गोविंद गावडे यांना कोडारवासीयांनी एक निवेदन सादर केले. त्यात कोडार गावात आयआयटी नकोच, असा उल्लेख केला आहे. यावर गोविंद गावडे यांनी कोडारवासीयांना पाठिंबा जाहीर केला.

Govind Gaude
Codar IIT Project: कोडार येथे ‘आयआयटी’ प्रकल्प नकोच; Watch Video

आदिवासींसाठी ‘उटा’ कार्यरत

विशेष म्हणजे ‘उटा‘ संघटनेचा पूर्ण पाठिंबा आदिवासी बांधवांना असेल. आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी ‘उटा’ संघटना कार्यरत असून या संघटनेच्या माध्यमातून कोडारवासीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचेही गोविंद गावडे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com