Indian constitution  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : म्हणे, भारतीय राज्यघटना गोमंतकीयांवर लादली : विरियातोंचे अनुद्‍गार

Viriato Fernandes : वेर्णेकर यांनी सांगितले, की संसदेने २६ जानेवारी १९५० रोजी लागू केलेली राज्‍यघटना गोमंतकीयांच्या डोक्यावर १९६१ मध्ये थोपली, असे अनुद्‍गार विरियातो फर्नांडिस यांनी प्रचार सभेदरम्यान काढले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, भारतीय राज्यघटना गोवा आणि गोव्यातील लोकांवर लादण्यात आली आहे, अशी टिप्पणी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी नुकतीच केली.

त्यांचे हे विधान दुर्दैवी आहे. ते माजी नौदल अधिकारी आहेत आणि मला त्यांच्याकडून चांगल्या अपेक्षा होत्या. जेव्हा जेव्हा त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार केला, तेव्हा तेव्हा त्यांनी राष्ट्रहितासाठी नसलेली भूमिका घेणे निवडले.

ध्वजारोहणाच्या वेळी भारतीय नौदलाविरुद्ध लढा असो किंवा आता राज्यघटनेबद्दल असो, विरियातो यांच्या टिप्पण्या दुःखद आहेत आणि इंडी आघाडी कशासाठी आहे हे प्रतिबिंबित करते. त्यांना राज्यघटना पायदळी तुडवायची आहे, ती वाचवायची नाही, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांनी केली आहे.

वेर्णेकर यांनी सांगितले, की संसदेने २६ जानेवारी १९५० रोजी लागू केलेली राज्‍यघटना गोमंतकीयांच्या डोक्यावर १९६१ मध्ये थोपली, असे अनुद्‍गार विरियातो फर्नांडिस यांनी प्रचार सभेदरम्यान काढले आहेत.

विरियातो यांच्या भाषणाचा तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणतात, ‘विधानसभेच्या गेल्या निवडणुकीआधी आम्हाला विरोधकांचा आवाज बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गोंयचो आवाज नावाचा मंच स्थापन केला.

त्यावेळी नव्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेल्या गिरीश चोडणकर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत १० मार्च २०१९ रोजी चर्चेसाठी बोलावले. दोनापावला येथील एका हॉटेलात ही भेट झाली. त्यावेळी मांडलेल्या १२ प्रश्नांत गोमंतकीयांना दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा होता.

गांधी यांनी मला तो मुद्दा घटनेला धरून आहे का अशी विचारणा केली. मी त्यांना नाही म्हणालो. गांधी म्हणाले, मग चर्चा नको. मी म्हणालो, माफ करा, कृपया ऐका. राज्य घटना २६ जानेवारी रोजी लागू केली, त्यावेळी आम्ही (गोमंतकीय) भारताचे भाग नव्हतो.

१९६१ मध्ये आम्ही मुक्त झालो, तेव्हा जी राज्यघटना तुम्ही मंजूर केली होती, त्यात आमचा समावेश नव्हता. ती राज्यघटना आमच्या डोक्यावर तुम्ही थोपली.

‘काँग्रेसचा लोकशाहीला धोका’

भारतीय राज्य घटना गोव्यावर जबरदस्तीने लादण्यात आल्याचा दावा करणाऱ्या काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराच्या टिप्पण्यांमुळे मी भयभीत झालो आहे. गोवा हा भारताचा अविभाज्य भाग आहे यावर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मनापासून विश्वास होता. गोवा मुक्ती काँग्रेसने १४ वर्षांनी लांबवली.

आता त्यांच्या उमेदवाराने भारतीय राज्य घटनेची पायमल्ली करण्याचे धाडस केले आहे. काँग्रेसने हे बेपर्वा भारत तोडो राजकारण ताबडतोब थांबवले पाहिजे. काँग्रेसचा आपल्या लोकशाहीला धोका आहे, असे याविषयी प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

विरियातो यांचे विधान निषेधार्ह ः वेर्णेकर

विरियातो यांचे हे विधान निषेधार्ह तर आहेच, याशिवाय देशातील सर्वात जुना पक्ष म्हणवणाऱ्या काँग्रेसने याविषयी जनतेला जाब दिला पाहिजे, असे वेर्णेकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT