Viresh Borkar Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

झुआरी पुलाच्या डागडुजीचे काम सरकारने त्वरित करावे

वीरेश बोरकरांची मागणी; ठिकठिकाणी खड्डे, कठड्याला भेगा पडल्याने आरजी आक्रमक

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील मांडवी पुलावरील ‘अटल सेतू’च्या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत चर्चा सुरू असतानाच झुआरी पूलही वाहनांना धोकादायक बनला आहे. या पुलाच्या रस्त्यावरील दिसणाऱ्या लोखंडी सळ्या, कठड्याला पडलेल्या भेगा व ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे तो कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे. सरकारने या पुलाच्या डागडुजीचे काम युद्धपातळीवर हाती घ्यावे, अशी मागणी सांतआंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी केली आहे.

झुआरी पूल हा उत्तर व दक्षिण जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा पूल असल्याने त्यावरून दिवसागणिक हजारो वाहने प्रवास करत असतात. या पुलाच्या दोन्ही कठड्याला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पुलाच्या दोन खांबावरील स्लॅब जोडणाऱ्या लोखंडी सळ्या दिसत आहेत. या पुलाची वारंवार तपासणी करण्यात आली असली, तरी वाहतुकीसाठी तो धोकादायक बनला आहे. एखादा मोठा अपघात या पुलावर घडल्यास कठडा मोडून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पुलाला समांतर असा नवा झुआरी पूल तयार होत आहे. मात्र, तोपर्यंत या जुन्या पुलाच्या डागडुजीचे काम बांधकाममंत्र्यांनी प्राधान्यक्रमाने हाती घेण्याची गरज आहे, असे बोरकर म्हणाले.

या पुलाची परिस्थिती खूपच नाजूक आहे. हा महत्त्वाचा पूल असल्याने खात्याने लोकांकडून तक्रारी येण्यापूर्वी व कोणताही मोठा अपघात घडण्यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने किंवा राज्याच्या बांधकाम खात्याने त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होण्याची गरज होती. या पुलाची तपासणी केली जाते त्या अधिकाऱ्यांना कठड्याला पडलेल्या भेगा धोकादायक वाटत नाही का असा प्रश्‍न आमदार बोरकर यांनी केला.

वाहनचालकांच्या हिताच्या दृष्टीने तसेच वादळी पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी तरी सरकारने गंभीरता ओळखून काम करावे, असे बोरकर यांनी मत व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT