पणजी: ‘‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाच्या (आरजी) कार्यालयाचा अधिकृत पत्ता नागझरवाडा-डिचोली येथील असून, राजस्थानच्या राजपत्रातही तशी नोंद आहे. तरीही मुख्य निवडणूक आयोग पक्षाच्या पाटो-पणजी येथील जुन्या कार्यालयाच्या पत्त्यावर पत्रव्यवहार करीत आहे.
आयोगाच्या या कृतीला आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयुक्त संजय गोयल यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे’’, अशी माहिती ‘आरजी’चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आमदार वीरेश बोरकर यांनी दिली. पणजीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘‘आरजीचे अधिकृत राष्ट्रीय कार्यालय घर क्रमांक २३८५/ए, नागझरवाडा-डिचोली या पत्त्यावर आहे.
२४ मार्च २०२४ रोजीच्या राजस्थान राजपत्रातही आरजीचे नाव, पक्षाचे राखीव निवडणूक चिन्ह ‘फुटबॉल’ आणि राष्ट्रीय कार्यालयाचा पत्ता अधिकृतरीत्या नमूद केला आहे. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ नोव्हेंबर २०२६ रोजी आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या योगदान अहवालासंदर्भातील अधिकृत पत्रव्यवहार थेट पक्षाच्या डिचोली येथील कार्यालयाच्या पत्त्यावर केला आहे.
बोरकरांनी मागितली जनतेची माफी
आमदार बोरकर यांनी बुधवारी गोव्यातील जनतेची माफी मागितली. ‘‘पक्षाचा कारभार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच काही व्यक्ती पक्षात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यांनी विधानसभेत निवेदन सादर केले, त्यांना पक्षाच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. पक्षाचा एकमेव आमदार असूनही आरजीचे इतर कोणत्याही पक्षात विलिनीकरण केलेले नाही. सत्यासाठी लढा देण्यावर मी आजही ठाम आहे’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.