Watch Video Dainik Gomantak
गोवा

Watch: इंग्लंडचा गोरा म्हणतो, 'तू बरो मनीस'... फाडफाड कोंकणी बोलणाऱ्या टेरीचा व्हिडिओ एकदा पाहाच

विदेशी पर्यटक स्थानिकांशी कोकणीत संवाद साधतानाचे व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात.

Pramod Yadav

Watch Video: किनारपट्टी राज्य आणि जगभरात पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या इवल्याशा गोव्याबाबत लोकांमध्ये विविध आकर्षण आहेत. येथील नाईट लाईफ असो, संगीत पार्टी, बीच, वैविध्यपूर्ण संस्कृती यासह कोकणी भाषेचे वेगळेपणे नेहमीच समोर आले आहे.

राज्यात येणारे विदेशी पर्यटक कोकणी भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असतात. विदेशी पर्यटक स्थानिकांशी कोकणीत संवाद साधतानाचे व्हिडिओ नेहमीच समोर येत असतात.

इंग्लंडच्या एका व्यक्तीचा कोकणी बोलतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. टेरी असे या व्यक्तीचे नाव असून, तो काही वाक्य कोकणीत बोलताना दिसत आहे.

चाव पिता, कॉफी पिता, तू बरो मनीस अशी वाक्य टेरी एका दमात बोलतो. त्यानंतर टेरी कोकणीत एक गाणे न थांबता अस्खलितपणे गाताना दिसत आहे. टेरीच्या या व्हिडिओ सध्या सर्व गोव्यात चर्चा होत असून, टेरीचे कौतुक होत आहे.

विदेशी पर्यटक येथे येऊन स्थानिक भाषा शिकण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यात यशस्वी देखील होत आहेत, हे पाहून आनंद होत असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. टेरीचा हा व्हिडिओ विविध सोशल माध्यामांवर पोस्ट करण्यात आला आहे. लोकांनी त्यावर लाईक, शेअर आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

SCROLL FOR NEXT