Mayor Rohit Monserrate Dainik Gomantak
गोवा

Panaji News : महापौर मोन्सेरात यांची नेटकऱ्यांनी उडवली टर

Panaji News : वनअर्थ फाउंडेशनने मिरामार किनाऱ्यावर आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानप्रसंगी महापौर रोहित मोन्सेरात यांचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, महापौर रोहित मोन्सेरात यांचे मिरामार किनाऱ्यावर स्वच्छता करणारे साधन हाताळतानाचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहे. त्या छायाचित्रावर प्रतिक्रिया व्यक्त करताना नेटकऱ्यांनी त्यांची टर उडवल्याचे दिसून येते.

वनअर्थ फाउंडेशनने मिरामार किनाऱ्यावर आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानप्रसंगी महापौर रोहित मोन्सेरात यांचे छायाचित्र समाजमाध्यमांत व्हायरल झाले आहे.

त्यावर नेटकऱ्यांनी व्यक्त होताना ‘सूट-बूटमध्ये किनारा स्वच्छता, हा एक विनोदच’ असे म्हटले आहे. ‘काय बाप आणि काय मुलगा, सफरचंद झाडापासून दूरवर पडत नाहीत,’ असेही नेटकऱ्यांनी नमूद केले आहे.

‘हीच गोष्ट खेचण्यासाठी मशिन वापरून काम जलद होऊ शकते. दिवसा झोपा काढून विकासाच्या गप्पा मारता येत नाहीत,’ असे नेटकऱ्याने सुनावले आहे.

याशिवाय ‘कृपया काही हरकत नाही सर! तुमच्या पोजनुसार मला वाटते तुम्ही मीडियासाठी पोज देत आहात! अनिल कपूर आणि अमरीश पुरी यांच्या ‘नायक’ या हिंदी चित्रपटाचे उदाहरण घेता येईल.

असे सर्वसाधारणपणे करतात! जिथे अमरीश पुरी आमदाराची भूमिका साकारतात! आजूबाजूला पाहिले तर तुझ्याशिवाय कोणी नाही! समुद्रकिनारा पूर्णपणे स्वच्छ आहे, आता मीडियाला माहिती आहे की तुम्ही काय साफ करत आहात! हा हा..! सुज्ञपणे विचार करा! गोवन असल्याचा अभिमान आहे.’ असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT