Fact Check Dainik Gomantak
गोवा

Fact Check: रेड लाईट एरियाच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडिओ खरचं गोव्यातला आहे का?

Goa Viral Video: एका बीचवर काही महिला उभ्या राहिल्या असून, हा गोव्यातील रेड लाईट एरिया असल्याचा दावा व्हिडिओतून करण्यात आला आहे.

Pramod Yadav

पणजी: सोशल मिडियाच्या जमान्यात अनेक व्हिडिओ अथवा फोटो विविध ठिकाणे किंवा प्रसंगाच्या नावाने व्हायरल होतात. बऱ्याचवेळा अशा व्हिडिओ आणि फोटोंची सत्यता न पडताळता त्यावर विश्वास ठेवला जातो. असाच एक व्हिडिओ गोव्यातील असल्याच्या नावाने व्हायरल होत असून, यात तो भाग रेड लाईट एरिया असल्याचा दावा करण्यात आला आहे. खरचं हा व्हिडिओ गोव्यातला आहे का? याची सत्यता आपण तपासून पाहणार आहोत.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून काय दावा करण्यात आलाय?

इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ (Reel) शेअर करण्यात आला आहे. यात बीचवर काही महिला उभ्या राहिल्या असून, हा गोव्यातील रेड लाईट एरिया असल्याचा दावा व्हिडिओतून करण्यात आला आहे. Marwari lover (marwarirj39m) या नावाने असलेल्या इन्स्टाग्राम चॅनलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १७,३९१ लाईक्स मिळाल्या असून, जवळपास ४३ हजार जणांकडून ही रिल शेअर करण्यात आली आहे. तर, ३६२ जणांनी यावर कमेंट केली आहे.

येथे पाहा व्हिडिओ

व्हिडिओ पडताळणीत काय आढळलं?

व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओ आम्ही पडताळणी केली असता काय सत्य समोर आले?

१) Instagram वर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची आम्ही INVID च्या मदतीने पडताळणी केली. Magnifier च्या मदतीने व्हिडिओ तपासला असता महिलेच्या मागच्या बाजुला पटाया सिटीचा डिजिटल बोर्ड दिसून येत आहे. व्हिडिओत दिसणारा हा बोर्ड बँकॉकमधील पटाया बीचवर असल्याचे पडताळणीत समोर आले.

Fact Check Image

२) व्हिडिओत ऐकू येणारी भाषा स्पष्ट नसल्याने समजण्यास अडचण येत आहे. तसेच, ही भाषा गोव्यातील कोकणी, इतर भारतीय भाषा किंव इंग्रजी असल्याचे स्पष्टपणे समजत नाही.

३) गोव्यात (दक्षिण किंवा उत्तर) कोणत्याही बीच परिसरात रेड लाईट एरिया अस्तित्वात नाही. तसेच, राज्यात अवैध पद्धतीने चालणाऱ्या वेश्याव्यवसायाविरोधात वारंवार पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

४) नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्या असून, हा फेक व्हिडिओ असल्याचे म्हटले आहे. गोव्यात रेड लाईट एरिया नाही तसेच गोव्याचे नाव खराब करण्याचा प्रयत्न करु नका, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओची सत्यता काय?

आम्ही केलेल्या पडताळणीत गोव्याच्या नावाने व्हायरल होणारा व्हिडिओ गोव्यातला नसल्याचे समोर आले आहे. व्हायरल होणारा व्हिडिओ पटाया शहरातला असून, तो गोव्यातला असल्याचा दावा आमच्या पडताळणीत खोटा आढळून आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT