मार्ना- शिवोलीत नवीन ट्रान्स्फॉर्मरची पायाभरणी केल्यानंतर आमदार विनोद पालयेंकर, सोबत सरपंच शर्मीला वेर्णेकर, उप-सरपंच विलीयम फर्नाडीस व इतर पंचसदस्य संतोष गोवे
गोवा

विनोद पालयेंकर: सहा महिन्याच्या आत होणार शिवोलीचा कायापालट

इंग्रजवाडा-मार्ना शिवोली येथील चर्च परिसरात नवीन ट्रान्स्फॉर्मरची (Transformers) पायाभरणी केल्यानंतर पालयेंकर बोलत होते.

दैनिक गोमन्तक

शिवोली: येत्या सहा महिन्याच्या कालावधीत शिवोली पंचक्रोशीतील जागोजागचे जुने वीज ट्रान्स्फॉर्मर (Transformers) बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असून सध्याच्या असुरळीत वीज पुरवठ्याला (Power Supply) त्यामुळे कायमचा आळा बसणार असल्याचे शिवोलीचे आमदार तथा माजी मंत्री विनोद पालयेंकर यांनी सांगितले. इंग्रजवाडा-मार्ना शिवोली येथील चर्च परिसरात नवीन ट्रान्स्फॉर्मरची (Transformers) पायाभरणी केल्यानंतर पालयेंकर बोलत होते. यावेळी मार्ना शिवोलीच्या सरपंच शर्मीला वेर्णेकर, उप-सरपंच विलीयम फर्नाडीस, पंच सदस्य सिल्वेस्टर फर्नाडीस, फेर्मीना फर्नाडीस, मोनाली आगरवाडेकर, तसेच स्थानिक चर्चचे धर्मगुरू उपस्थित होते.

दरम्यान, हणजुण पंचायत क्षेत्रात आतापर्यंत तेहतीस कोटींचे भुमीगत वीज वाहिन्या (Power lines) टाकण्याचे काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे लवकरच याभागात अजून तेवीस नवीन वीज ट्रान्स्फॉर्मर (Power transformer) बसवण्यात येणार असल्याची माहिती आमदार पालयेंकर यांनी दिली.

त्यांचप्रमाणे पावसाळा संपताच ऑक्टोबरच्या सुरुवातीला पंचक्रोशीतील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांचे (Roads) डांबरीकरण हाती घेण्यात येणार असल्याने यापुढे पुर्ण कायापालट झालेला शिवोलीचा मतदारसंघ तुमच्या समोर दिसणार असल्याचे आश्वासन पालयेंकर यांनी दिले. यावेळी सरपंच शर्मीला वेर्णेकर तसेच उप-सरपंच विलीयम फर्नाडीस यांचीही समयोचित भाषणे झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT