Adivasi Sahitya Sammelana President Vincy Quadrus
काणकोण: गोवा राज्यात सुरू झालेल्या आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक विन्सी क्वाद्रूस यांची केपे येथे आदिवासी संघटनेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली.
विन्सी हे राष्ट्रीय कोकणी लेखक, अनुवादक आणि पत्रकार असून आजपर्यंत त्यांनी देवनागरी आणि रोमन लिपीत ६६ पुस्तके लिहिली आहेत. त्यांना बाल साहित्यासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार व ५ पुस्तकांना राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ्
यंदाचे साहित्य संमेलन हे गोवा आदिवासी साहित्य संघातर्फे खांडोळा सरकारी महाविद्यालय व कला आणि संस्कृती संचालनालयाच्या मदतीने सरकारी महाविद्यालय खांडोळा येथे १४ डिसेंबर रोजी घेण्याचे ठरवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.