KTCL Buses Goa  Dainik Gomantak
गोवा

KTCL Buses: कदंबवरून 'बोलो जुबां केसरी' हटवा, महिन्याभरात जाहिराती न काढल्यास... महामंडळाचा इशारा

कंदबच्या 300 बसेसवर तीन वर्षांसाठी जाहिराती चिटकवण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले होते.

Pramod Yadav

KTCL Buses Goa: राज्यातील मुख्य सार्वजनिक वाहतूक असलेल्या कदंब बसेसवर विमल पान मसाल्याच्या जाहिराती चिटकवण्यात आल्या आहेत. बसवरील जाहिराती काढाव्यात अशी मागणी वारंवार विद्यार्थी, पालक आणि डॉक्टरांनी निवेदन देऊन केली.

याची महामंडळाने आता गंभीर दखल घेत, सर्व बसवरील विमलच्या 'बोलो जुबां केसरी' जाहिराती काढून टाकाव्यात असा ठेका दिलेल्या कंत्राटदाराला आदेश दिला आहे.

कंत्रादाराने महिनाभरात जाहिराती काढून टाकल्या नाहीत तर महामंडळ स्वत: जबरदस्तीने या जाहिराती काढून टाकेल असाही इशारा महामंडळाने दिला आहे.

कंदबच्या 300 बसेसवर तीन वर्षांसाठी जाहिराती चिटकवण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले. त्यापैकी 80 बसेसवर विमल पानमसाल्याची जाहिरात चिटकवण्यात आली. या सर्व जाहिराती हटवून त्याठिकाणी दुसरी जाहिरात लावण्यास कंत्राटदाराला सांगितले आहे. अशी कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी एका मराठी दैनिकाला माहिती दिली आहे.

कदंबवर चिटकवण्यात आलेल्या विमल पान मसाल्याची जाहिरात तंबाखू विषयक असल्याने समाजात चुकीचा संदेश जात आहे. याबाबत विद्यार्थी, डॉक्टर, पालक आणि शिक्षक यांच्याकडून महामंडळाला वारंवार निवेदन देऊन जाहिराती हटविण्यास सांगितले.

कदंब महामंडळाने कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी जाहिरात लावण्याचे कंत्राट दिले होते. त्याचे पैसे देखील महामंडळाने घेतले. दरम्यान, लावलेली जाहिरात तंबाखू विषयक असल्याने त्यावर आक्षेप घेण्यात आला. जाहिरातीला मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यानंतर अखेर कंदब महामंडळाने जाहिराती हटविण्याचे आदेश कंत्राटदाराला दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT