Kudchire Illegal Stone Mining Dainik Gomantak
गोवा

Illegal Stone Mining: कचरा प्रकल्पाने कुडचिरेत हानी मग बेकायदा चिरेखाणींकडे का दुर्लक्ष? दबाव की जाणीवपूर्वक कानावर हात?

Kudchire Illegal Mining: कुडचिरेत चालणाऱ्या काही बेकायदा चिरेखाणींकडे ग्रामस्थ दुर्लक्ष का करत आहेत असा सवाल

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या जागेत कुडचिरे गावापासून केवळ दीडशे मीटर जागेवर चालणाऱ्या काही बेकायदा चिरेखाणींकडे ग्रामस्थ दुर्लक्ष का करत आहेत? या चिरेखाणींमुळे नष्ट झालेली वनराई, निर्माण झालेल्या लाल मातीच्या हजारो ढिगाऱ्यांमुळे होणाऱ्या निसर्ग हानीकडे येथील ग्रामस्थ कुणाच्या दबावामुळे दुर्लक्ष करतात, की जाणूबुजून त्याकडे डोळेझाक करत आहेत, असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

नॉर्वे सरकारच्या मदतीने गोव्यात कुडचिरे येथे टाकावू बांधकाम साहित्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यासाठी कचरा व्यवस्थापन महामंडळाने हालचाली सुरू केल्या, त्यासाठी महामंडळाच्या मालकीच्या जागेचा वापर होणार आहे. परंतु महामडंळाच्याच जागेत म्हणे बेकायदा चिरेखाणी निर्माण झाल्या आहेत आणि त्या खाणींकडे येथील लोकांचे दुर्लक्ष का होत आहे, हा सवाल उपस्थित होणे साहजिक आहे.

याविषयी पर्यावरण अभ्यासक रमेश गावस यांनी ‘गोमन्तक''ला सांगितले की, बेकायदेशीर चिरेखाणी चालविणे हे राजकारण्यांशी हात मिळवणी केल्याशिवाय शक्य नाही. त्यात सत्ताधारी आणि विरोधीसुद्धा असू शकतात.

बेकायदा चिरेखाणी चालू देणे याला सरकारी यंत्रणा जबाबदार आहे. गावाच्या बाजूला बेकायदा खाणी चालू असताना त्याविरोधात न बोलणे म्हणजे एकप्रकारे बेकायदेशीर व्यवसायाला उत्तेजन देण्यासारखेच आहे.

गेली दोन दिवस कुडचिरेतील वातावरण तापलेले आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या प्रस्तावित प्रकल्पाचे पडसादही रविवारच्या ग्रामसभेत उमटले. महामंडळाने ४४ हजार चौ. मी. जागा संपादित केली आहे. महामंडळाने नुकत्याच केलेल्या भू सर्वेक्षणाला ग्रामस्थांनी विरोध केला होता.

प्रकल्प आल्यास नैसर्गिक जलस्रोतावर संकट येईल, असे मुख्यमंत्र्यांना म्हणे पंचायतीने कळविले आहे. परंतु येथील बेकायदेशीर चिरेखाणींमुळे नैसर्गिक हानी होत नाही का? या बेकायदेशीर चिरेखाणींची कल्पना पंचायतीने मुख्यमंत्र्यांना दिली आहे का? नसेल दिली तर ती का दिली नाही? असेही आता प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

सरकार काय पावले उचलणार?

बेकायदेशीर चिरेखाणींवर कारवाई करण्याचे काम खाण खात्याचे आहे. जर कुडचिरेत बिनदिक्कतपणे बेकायदेशीर चिरे खाणी चालत असतील तर त्यावर आता सरकार काय पावले उचलणार आहे. उपलब्ध झालेल्या सॅटेलाईट छायाचित्रांतून गावापासून केवळ दीडशे मीटर अंतरावर बेकायदेशीर चिऱ्यांची खाण खोदण्यात आल्याचे दिसत आहे. त्यामुळे येथील बेकायदा खाणी बंद करण्यासाठी खाण खाते किंवा डोंगर कापणी केल्यामुळे नगर नियोजन खाते आता दंडात्मक कारवाईचा बडगा उगारणार का? हे पहावे लागणार आहे.

राज्यातील सरकारच्या मालकीच्या असणाऱ्या खनिज संपत्तीवर जो बेकायदेशीरपणे डल्ला मारला जात आहे, तो सरकारला थांबवता येत नसेल तर कायदेशीर खाणी सुरू केल्यानंतर त्यावर काय आणि कसे लक्ष ठेवणार आहे, असा सवालही उपस्थित होतो.
रमेश गावस, पर्यावरणप्रेमी
राज्यात चिरेखाणींना बंदी नाही, मात्र पर्यावरण परवाना घेतल्याशिवाय हा व्यवसाय करता येत नाही. कायदेशीरपणे केल्यास महसूल सरकारी तिजोरीत जाईल व अधिकाऱ्यांना मलिदा मिळणार नाही. म्हणून यंत्रणाही झोपेचे सोंग घेते.
क्लॉड आल्वारिस, गोवा फाऊंडेशन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Murder: नवऱ्यापासून झालेली मुलगी आवडत नव्हती; बॉयफ्रेन्डसोबत मिळून आईने 2.5 वर्षाच्या बाळाला संपवले, गोवा हादरला

Ashok Saraf: 'अशें, तुका कळूंक ना?' अशोक मामांच्या तोंडी पुन्हा प्रोफेसर धोंड; सोशल मीडियावर VIDEO तूफान व्हायरल

Viral Video: बंगळुरुत वाहतूक पोलिसाची दादागिरी! बाईकस्वाराला थप्पड मारतानाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'ही तर वर्दीतील गुंडगिरी...'

Gujrat Politics: गुजरातमध्ये चाललंय काय? मुख्यमंत्री वगळता सर्वच्या सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Viral Post: कॅन्सर जिंकला! 'ही माझी शेवटची दिवाळी...' 21 वर्षीय तरुणाची भावूक पोस्ट; नेटिझन्सकडून 'चमत्कारा'साठी प्रार्थना

SCROLL FOR NEXT