Vijay Shridhar Desai Dainik Gomantak
गोवा

Goa News : जिवंत पुतळा बनणारा अवलिया कलाकार 'विजय देसाई' ; 8-9 तास एकाच जागेवर राहतात न हलता, न बोलता

पोलिस सेवेत असलेले विजय श्रीधर देसाई हे न हलता आठ ते नऊ तास एका जागेवर पुतळा बनून राहतात. या कलेसाठी आतापर्यत त्यांना अनेक बक्षिसे प्राप्त झालेली आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पुतळे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते न हलणारे, ऊन-पावसाचा मारा सोसणारे निर्जीव चित्र. पण हेच चित्र जर एक जिवंत माणूस साकारू लागला तर आपल्याला आश्चर्य वाटेल. होय, मूळ पेडणे येथील,

सध्या कुडचडेत स्थायिक झालेले व पोलिस सेवेत असलेले विजय श्रीधर देसाई हे c या कलेसाठी आतापर्यत त्यांना अनेक बक्षिसे प्राप्त झालेली आहेत.

विजय देसाई यांना जिवंत पुतळे साकारण्याची भारी हौस. त्यांनी आत्तापर्यंत महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लालबहादूर शास्त्री, गोरा कुंभार, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज, शेतकरी, रेंदेर, दादा वैद्य असे अनेक जिवंत पुतळे साकारले आहेत.

दरवर्षी होणाऱ्या शिगमोत्‍सवात त्यांचा जिवंत पुतळा दिसून येतो. पोलिस सेवेत असूनसुद्धा त्यांनी गोव्यातील अनेक वेशभूषा स्पर्धांत सहभागी होऊन त्‍यांनी बक्षिसे मिळविली आहेत. त्यांनी या कलेसाठी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ते ज्याप्रमाणे सहज जिवंत पुतळ्याची वेशभूषा साकारतात, ते पाहून लोकही अचंबित होतात.

आपल्‍या कलेबाबत विजय देसाई सांगतात, जिवंत पुतळे साकारण्यासाठी संपूर्ण अंगाला रंग फासावा लागतो. प्रथम मी सिंधुदुर्ग येथील एका वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालो होतो. तेथे मला तिसरे बक्षीस प्राप्त झाले.

जो रंग अंगाला फासतात, तो मुंबईहून आणावा लागतो. एक वेशभूषा साकारण्यासाठी सुमारे तीन ते चार हजार रुपये खर्च येतो. पण जे बक्षीस मिळते, त्याची किंमत तेवढी नसते.

मी फक्त माझी आवड म्हणून ही कला जोपासतो. अनेकदा मला खास वेशभूषेसाठी आमंत्रित करण्यात येते. त्यावेळी एक वेगळाच आनंद मिळतो.

जिवंत पुतळे साकारण्यासाठी बरीच साधना करावी लागते. एकाच जागेवर आठ-नऊ तास न हलता रहावे लागते. त्‍यासाठी आपण सकाळी, दुपारी व संध्याकाळी रोज ध्‍यान करतो. अनेक बक्षिसे मिळविली आहेत.

ही कला जोपासताना पोलिस सेवेत कधीच कुचराई केली नाही. मी माझी सेवा प्रामाणिकपणे पार पाडत आहे. उत्कृष्ट पोलिस सेवेबद्दल आतापर्यंत दहा प्रशस्‍तिपत्रके मिळाली आहेत.

- विजय देसाई, कलाकार तथा पोलिस कर्मचारी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT