Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

'...तर गोव्‍यातील उद्योग दुसऱ्या राज्‍यांमध्ये जातील!'

विजय सरदेसाई : निकृष्ट दर्जाचा वीजपुरवठा; अधिवेशनात आवाज उठविणार

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : गोव्यातील उद्योग चढ्या दराने वीज खरेदी करत असूनही त्यांना होणारा वीज पुरवठा निकृष्ट दर्जाचा असणे ही धक्कादायक बाब असून गोव्यातील उद्योगांना सतावणाऱ्या या समस्येवर आपण य विधानसभेच्या आता येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे.

गोव्यातील उद्योगांप्रती सरकारने हीच अनास्था दाखविली तर एक एक करून गोव्यातील उद्योग इतर राज्यात जातील आणि त्याचा विपरीत परिणाम गोव्यातील रोजगारावर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. हा गंभीर संशय असून हजारोंच्या रोजगाराशी तिचा संबंध आहे. सरकार त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारची उद्योगांप्रती हीच अनास्था असेल तर भविष्यात गोव्यात नवीन उद्योग येणेही कठीण होतील असे सांगून त्यामुळेच गोवा फोरवर्डने या समस्येची गंभीरपणे दखल घेतली आहे असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

गोव्यातील उद्योगांना व्यवस्थित वीज पुरवठा होत नसल्याने त्यांच्या उत्पादनावर परिणाम तर होतोच त्याशिवाय यंत्रसामग्री बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे याकडे लक्ष वेधताना सरकार खुल्या बाजारातून वीज विकत घेत आहे मात्र ही वीज विकणाऱ्या कंपन्यांना निकृष्ट पुरवठा केल्यास जो दंड आकारायचा असतो त्याची तरतूद या व्यवहारात नाही. त्याचेच विपरीत परिणाम सध्या राज्यातील उद्योगांना सोसावे लागत आहेत असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

या समस्येचे बळी ठरलेल्या उद्योजकांनी गोवा फॉरवर्डकडे त्यांच्या समस्या मांडाव्यात आणि आवश्यक त्या सूचना कराव्या असे आवाहन करीत पावसाळी अधिवेशनात त्यावर आवाज उठवून गोव्यातील उद्योजकांची ही समस्या दूर करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करेल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाहून अधिक वाट पाहिली, रुग्णवाहिका वेळेवर न मिळाल्याने 46 वर्षीय वीज कर्मचाऱ्याचा मृत्यू; म्हापशातील धक्कादायक घटना

Goa Murder Case: पीर्ण येथे तरुणाचा खून? खुल्या पठारावर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

Operation Sindoor: 'कोण काय करतं, कधी येतं, सगळं माहीतीये,' ऑपरेशन सिंदूरसाठी भारतीय नौदल सज्ज; व्हाईस ॲडमिरल वात्स्यायन यांचं वक्तव्य VIDEO

LeT terrorist shot dead: हाफिज सईदचा खास माणूस, लष्कर ए तैयबाचा दहशतवादी शेख मोईज मुजाहिदची गोळ्या घालून हत्या; Photo, Video समोर

Australia vs India, 2nd T20: टीम इंडियाचा फ्लॉप शो! मेलबर्नमध्ये 17 वर्षांनंतर पराभव, ऑस्ट्रेलियानं 4 गडी राखत मिळवला विजय

SCROLL FOR NEXT