Vijay Sardesai |Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: ... हे आजचे मरण जुलैपर्यंत ढकलले, एवढेच !

म्हादई संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिला, त्याने फक्त आजचे मरण जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, एवढेच म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमन्तक

Mahadayi River: म्हादई संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयाने जो काय निकाल दिला, तो गोव्याच्या हिताचा, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणत आहेत. पण प्रत्यक्षात या निर्णयामुळे गोव्याचे कसलेच हित साध्य झाले असे वाटत नाही. फक्त आजचे मरण जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, एवढेच म्हणता येईल, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी आज व्यक्त केली.

काल मडगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरदेसाई म्हणाले, म्हादईचा ज्वलंत प्रश्न कर्नाटक राज्यांतील निवडणूक पार पडेपर्यंत शितपेटीत टाकण्याच्या केंद्र सरकारच्या करस्थनाचाच हा विजय असे म्हणावे लागेल.

कर्नाटक राज्यातील निवडणूक 21 मे ला संपणार आहे. आणि सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणात पुढील सुनावणी जुलै महिन्यात ठेवण्यात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सरदेसाई म्हणाले, म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कळसा आणि भांडूरा येथे जे काम चालू आहे ते बंद करण्यासाठी गोवा सरकारने अंतरिम स्थगिती मागितली होती. पण ही स्थगिती देण्यात आलेलीच नाही.

उलट सर्व परवानग्या मिळाल्याशिवाय कर्नाटक सरकारला पाणी वळविता येणार नाही, हा जल तंटा लवादाचा निर्णय कायम आहे,असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हा गोव्याचा विजय कसा, असा प्रश्‍न सरदेसाई यांनी केला.

ही सगळ्याच बाजूंनी गोव्याची पिछेहाट !

ज्या वन संवर्धन कायद्याच्या कलम 29 नुसार गोव्याला दिलासा मिळेल अशी जी आशा व्यक्त केली जात तीही फोल ठरली आहे. गोवा सरकारने मुख्य वन्यजीव वॉर्डनकडे जी तक्रार केली आहे.

त्या तक्रारीवर काय निर्णय होतो ते पाहिल्यावर या प्रश्नावर विचार करता येईल, असे न्यायालयाने म्हटले असल्याने गोव्याची सगळ्याच बाजूंनी पिछेहाट झाल्याचे सिद्ध झाले आहे, असे सरदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Helicopter Crash: फ्रान्समध्ये थरार! आग विझवणाऱ्या हेलिकॉप्टरचे तलावात क्रॅश लँडिंग; सुदैवाने जीवितहानी टळली Watch Video

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

SCROLL FOR NEXT