Vijay Sardesai
Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: समाजकंटकांना राजकीय पाठबळ नको

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: फातोर्डा मतदारसंघात सर्वधर्मीय लोक एकत्रित राहतात. मारहाण करत कायदा हातात घेण्याचा कुणालाच अधिकार नाही. काहीजणांमुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्यास पोलिसांनी अशा घटकांवर कडक कारवाई करावी. अशा समाजकंटकांना राजकीय पाठिंबा मिळू नये, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

हिंदू स्मशानभूमीत कचरा टाकण्यावरून झालेल्या वादावर बोलताना सरदेसाई यांनी सांगितले की, हिंदू स्मशानभूमीत कचरा टाकल्याबाबत विचारणा केल्यानंतर हल्ला करण्याचा प्रकार चुकीचाच आहे. या घटनेचा निषेध नोंदवतो. कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. पोलिसांनी अशा घटकांवर निष्पक्षपणे कडक कारवाई करावी.

दरम्‍यान, भाजपचे माजी प्रवक्‍ते सावियाे रॉड्रिग्स यांनीही या घटनेचा निषेध केला. हिंदू स्‍मशानभूमीत कचरा आणून टाकण्‍याची घटनाच आक्षेपार्ह असून ही कृती धार्मिक तणाव निर्माण करण्‍यासाठी केली गेली होती का, याचा तपास करणे आवश्‍‍यक आहे. मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या घटनेचा सखोल तपास करावा, अशी मागणीही त्‍यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Film City: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT