Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

सांगोल्डा येथे आज (4 जुलै) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. सुयेश सुशांत कोरगावकर (25, गिरी) असे पीडिताचे नाव आहे.
Panchyat Membares
Panchyat MembaresDainik Gomantak

लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

लाटंबार्से पंचायतीत लवकरच सत्ताबदल होऊ शकतो. यासंबंधीच्या अटकळी बांधल्या जात आहेत. उपसरपंचांसह पाच पंचसदस्य वेगळी भूमिका घेऊ शकतात. सरपंच पद्माकर मळीक यांच्या विरोधात अविश्वास ठराव. डिचोलीचे आमदार चंद्रकात शेट्ये यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Panchyat Membares
Panchyat MembaresDainik Gomantak

सांगोल्डा येथे भीषण अपघात, दुचाकी चालकाचा मृत्यू

सांगोल्डा येथे आज (4 जुलै) दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. सुयेश सुशांत कोरगावकर (25, गिरी) असे पीडिताचे नाव आहे.

Accident
Accident Dainik Gomantak

कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी होणार: CM सावंत

म्हादई प्रवाह समितीच्या सदस्यांकडून कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी केलेल्या कामांची पाहणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, त्यांच्या पाहणीनंतरच सत्य समोर येईल.

Chief Minister Pramod Sawant
Chief Minister Pramod Sawant Dainik Gomantak

म्हापसामध्ये FDA ची मोठी कारवाई; 500 किलो पनीर जप्त

अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुरुवारी (4 जुलै) पुन्हा एकदा म्हापसा नवीन बसस्थानकावर दीड लाखांचा 500 किलो पनीर जप्त केले. महाराष्ट्र आणि कर्नाटक येथून येणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली.

राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

हिंदू हिंसक असण्याबाबत लोकसभेत केलेल्या वक्तव्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात फोंडा पोलिस स्थानकात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिंदू नेते राजीव झा यांनी ही तक्रार दाखल केली.

Rahul Gandhi
Rahul GandhiDainik Gomantak

म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

गेले काही दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे म्हादई नदीच्या पात्रात मोठी वाढ. अनेक ठिकाणी दुथडी भरुन वाहणारे पाणी रस्त्यांवर पोहोचले.

Mhadai River
Mhadai RiverDainik Gomantak

कोर्टाचा सख्त आदेश; घरमालकांनीच मोडली बेकायदेशीर घरे

आल्तिन येथील गणपती मंदिर शेजारी असलेली 4 बेकायदेशीर घरे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार मोडण्यात आली. कोर्टाच्या आदेशात ही घरे घरमालकांनीच मोडावी असे म्हटले होते. त्यामुळे ही बेकायदेशीर घरे घरमालकांनी मोडली.

House
House

सरदेसाईंच्या मडगावातील जनता दरबारला मोठा प्रतिसाद!

गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या मडगावातील जनता दरबारला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. दक्षिण गोव्यातील वेगवेगळ्या भागातून लोकांनी जनता दरबारला हजेरी लावली. लोकांच्या समस्या विधानसभा अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती यावेळी सरदेसाई यांनी दिली.

Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

धावे सत्तरीत विहीरीत बुडून एकाचा मृत्यू!

धावे सत्तरीत कृषी खात्याच्या फार्ममधील विहीरीत बुडून सुर्यकांत गावकर (रा.धावे, वय 70) या वृद्धाचा मृत्यू झाला. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

प्राणघातक हल्ल्याप्रकरणी एक जणाला अटक

व्हॅलेरी मिलाग्रेस डायस यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संशयित पुरुषोत्तम दीनानाथ वेर्लेकरवर (मयडे) म्हापसा पोलिसांकडून गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरु

जन्मदात्रीचा स्वत: ला संपवण्यासह पोटच्या मुलांना जीवे मारण्याचा प्रयत्न
Goa Crime News Dainik Gomantak

गोव्यात आज ऑरेंज अलर्ट तर उद्यापासून 8 तारखेपर्यंत यलो अलर्ट; हवामान खात्याची माहिती

गोव्यात आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. तर उद्यापासून 8 तारखेपर्यंत यलो वर्तवण्यात आला आहे. राज्यातील दोन्ही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ताशी 40-50 kmph वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Rain Update
Rain UpdateDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com