Goa Government Job: सरकारी नोकरीसाठी ॲप्रेन्‍टिसशीप ‘मस्‍ट’

Goa Government Job: मुख्‍यमंत्री सावंत यांचा पुनरुच्‍चार
Goa Government Job
Goa Government JobDainik Gomantak

Goa Government Job: सरकारी नोकरीसाठी ‘ॲप्रेन्‍टिसशीप’ करणे यापुढे सक्‍तीचे असेल. तसेच ‘आयटीआय’ला दहावी, बारावी समकक्ष समजले जाईल, असा पुनरुच्‍चार मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज येथे केला.

Goa Government Job
Dog In Goa: कुत्र्याने घेतला छोट्या मुलीचा चावा; मालकाविरुद्ध गुन्हा

पर्वरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नवीन इमारतीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी शिक्षण या विषयावर त्‍यांनी विस्‍ताराने भाष्‍य केले. गोव्याच्या शिक्षण पद्धतीत भरपूर प्रगती झाली आहे. इतर अनेक व्यावसायिक व शैक्षणिक आस्थापनांशी संपर्क साधून गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय दिले जातील, असेही त्‍यांनी सांगितले.

Goa Government Job
Theft In Sanquelim: साखळीतही दोन फ्लॅट फोडले

याप्रसंगी मुख्यमंत्री सावंत यांच्यासह आयटी व पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार कृष्णा साळकर, शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर, चेअरमन भागिरथ शेट्ये, रुपेश ठाणेकर, शैलेश झिंगडे, कविता नाईक, पेन द फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर आदी उपस्थित होते.

शिक्षण मंडळाची ही वास्तू साकार करण्यात हातभार लावलेल्या सर्वांचे आभार मानून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, की गोव्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये भरपूर प्रगती झाली आहे. आता संगणकीकरणाच्या बाबतीत गोवा मागे राहिला नसून शिक्षण मंडळाचे कामकाजही संगणकीकृत झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com