Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: पक्षांतराची हॅट्‌ट्रिक पुन्हा शक्य, सरदेसाईंची काँग्रेसवर टीका; युतीचा विशेष फायदा नाही!

Vijay Sardesai Congress Split: २०१९ मध्ये काँग्रेसचे दहा आमदार आणि २०२२ मध्ये आठ आमदार सत्ताधारी पक्षात गेले होते.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: २०१९ मध्ये काँग्रेसचे दहा आमदार आणि २०२२ मध्ये आठ आमदार सत्ताधारी पक्षात गेले होते. या पार्श्वभूमीवर आगामी काळात काँग्रेसमध्ये पुन्हा फूट पडून पक्षांतराची ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण होईल, असा दावा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. मात्र युतीविषयक चर्चेचा फारसा परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गोवा विधानसभेचे ३१ ऑगस्टपासून तीनदिवसीय पावसाळी अधिवेशन होत आहे. त्याचे कामकाज निश्चित करण्यासाठी शुक्रवारी सकाळी विधानसभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला जाण्यापूर्वी सरदेसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मूळ राजकीय भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. पक्षाच्या विचारधारेवर आम्ही ठाम आहोत. आघाडीबाबतचा अंतिम निर्णय पक्षाची उच्चस्तरीय मध्यवर्ती समिती, कार्यकर्ते आणि नेत्यांच्या भावना विचारात घेऊन लवकरच घेतला जाईल.

‘म्हाजो गाव थंय हांव’ मोहीम

राज्यभर जनसंपर्क वाढविण्यासाठी ‘म्हाजो गाव थंय हांव’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शनिवारपासून (ता. २२) कुशावती जिल्ह्यातील सावर्डे भागातून या अभियानाचा औपचारिक शुभारंभ होईल. पक्षाचे नेते व कार्यकर्ते गावोगावी जाऊन नागरिकांचे प्रश्न समजून घेतील. तसेच गोव्याच्या प्रादेशिक अस्मितेवर आधारित मुद्द्यांवर जनमत तयार केले जाईल, असे सरदेसाई यांनी सांगितले.

नंतर करणार घोषणा...

काँग्रेसबरोबर आघाडी करण्याबाबतची चर्चा पक्षाने स्थगित ठेवली आहे. हा आमच्या पक्षाचा निर्णय असून, सध्या तरी त्यात कोणताही बदल झालेला नाही. यासंदर्भात काही घडामोडी झाल्यास पक्षाकडून त्याची घोषणा करण्यात येईल, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या गोवा दौऱ्यानंतरही पक्षातील ऐक्याबाबत जनतेच्या मनातील शंका कायम असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांनाही आवाहन : विरोधकांनी एकत्र येऊन ‘पर्यायी धोरणात्मक चौकट’ जनतेसमोर मांडली पाहिजे. बीसीएच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर विधानसभेत पुरेशी चर्चा करण्याची ठाम मागणी करण्यात आली. सरकारचे गैरप्रकार आणि भ्रष्टाचार उघडकीस आणून जनतेचे प्रश्न मांडणे, हेच कार्यक्षम लोकशाहीचे मूळ लक्षण आहे. विरोधकांच्या या मागणीची दखल घेत शुक्रवारी ‘प्रायव्हेट मेंबर्स डे’सह इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा घेण्याचे मान्य करण्यात आल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT