आमदार विजय सरदेसाई  Dainik Gomantak
गोवा

विजय सरदेसाई यांच्याकडून कामत गटावर विश्वासघाताचा आरोप

डाटा ऑपरेटर नियुक्तीशी संबंध नसल्याचा खुलासा

दैनिक गोमन्तक

मडगाव : मडगाव पालिकेत सध्या गाजत असलेल्या डाटा ऑपरेटर नियुक्ती प्रकरणावरून सध्या फातोर्डा फॉरवर्ड व मॉडेल मडगाव या गटातील नगरसेवकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आम्हाला काळोखात ठेवून केलेले हे कृत्य अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना हा आमच्याशी केलेला एक प्रकारचा विश्वासघात अशी सनसनाटी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सरदेसाई यांचा फातोर्डा फॉरवर्ड आणि दिगंबर कामत यांचा मॉडेल मडगाव या दोन गटांनी एकत्र येऊन मडगाव पालिकेत भाजपला बाजूला ठेवत नगरमंडळ स्थापन केले होते. यावेळी पाहिले १५ महिने फॉरवर्डचा नगराध्यक्ष, तर नंतरच्या १५ महिन्यांसाठी मॉडेल मडगावचा नगराध्यक्ष असा फॉर्म्युला ठरला होता. ठरलेल्या करारानुसार पुढच्या महिन्यात नगराध्यक्ष बदलणार आहे. असे असताना स्वतः नगराध्यक्ष बनू पाहणाऱ्या घनश्याम शिरोडकर यांनी हे डाटा ऑपरेटर्स नियुक्ती प्रकरण उकरून काढताना दिगंबर कामत आणि विजय सरदेसाई यांच्या आशीर्वादाने या नियुक्त्या झाल्याचा आरोप केला होता.

‘आम्हाला अंधारात ठेवून नियुक्त्या’

आमदार विजय सरदेसाई यांनी या नियुक्त्यांबद्दल आपल्याला काहीच माहिती नसून आपल्या गटातील एकही नगरसेवक त्यात सामील नाही. नगराध्यक्ष लिंडन परेरा हे नसताना त्यांच्या गैरहजेरीत नगराध्यक्षपदाचा ताबा सांभाळणाऱ्या उपनगराध्यक्ष दीपाली सावळ यांच्या सहीने ही नियुक्तीपत्रे गेली असून आम्हाला अंधारात ठेवून एकाच मतदारसंघातील पाचजणांच्या या नियुक्त्या केल्या गेल्या, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात खळबळ! नावेलीमधून दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण, मडगाव पोलिसांकडून तातडीने शोध सुरु

IFFI 2025 Opening Ceremony: 56व्या इफ्फीची दणक्यात सुरुवात, गोव्याच्या चित्ररथांची मिरवणूक ठरली सांस्कृतिक आणि कलात्मक पर्वणी VIDEO

Delhi Blast Case: दिल्ली स्फोट प्रकरणी 'एनआयए'ची मोठी कारवाई! चार मुख्य आरोपींना अटक; 2900 किलो स्फोटकांचा साठा जप्त

IFFI 2025: गोवा बनलं जागतिक सिनेमाचं घर, 56व्या 'IFFI'चं थाटात उद्घाटन; CM सावंतांनी सिनेप्रेमींना दिला 'येवकार'

Viral Video: कोरियन महिला खासदारानं गायलं 'वंदे मातरम', फिल्म बाजारमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT