द्विज पालयेकर, साई नाईक Dainik Gomantak
गोवा

Vijay Merchant Trophy: गोव्याची मुले सौराष्ट्रवर भारी; 73 धावांनी विजय, द्विज पालयेकरचे 5 बळी

सौराष्ट्रचा दुसरा डाव 152 धावांत संपुष्टात

किशोर पेटकर

Vijay Merchant Trophy: फिरकी गोलंदाज द्विज पालयेकर (34-5) व मध्यमगती शमिक कामत (26-3) यांच्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर गोव्याने विजय मर्चंट करंडक 16 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत रविवारी सौराष्ट्रला 73 धावांनी हरविले.

सामना सूरत येथील खोलवाड जिमखाना मैदानावर झाला.

स्पर्धेच्या ब गटातील सामन्याच्या तिसऱ्या व अखेरच्या दिवशी गोव्याचा दुसरा डाव कालच्या 4 बाद 160 वरून 216 धावांत आटोपला. पहिल्या डावातील 9 धावांच्या आघाडीमुळे गोव्याने सौराष्ट्रसमोर विजयासाठी 226 धावांचे आव्हान ठेवले.

सौराष्ट्रचा दुसरा डाव 152 धावांत संपुष्टात आला.

जय रवालिया (54) व वेदांत जादव (73) यांनी अर्धशतके नोंदवत गोव्याच्या गोटात चिंता निर्माण केली. द्विज याने वेदांतला पायचीत बाद केल्यानंतर सौराष्ट्राचा दुसरा डाव कोसळला.

त्यांनी अखेरच्या 5 विकेट 8 धावांत गमावल्या आणि गोव्याला स्पर्धेतील स्पर्धेतील मोहिमेची सुरवात विजयाने करणे शक्य झाले.

गोव्याची द्विशतकी धावसंख्या

त्यापूर्वी, कालच्या वैयक्तिक धावसंख्येत एका धावेची भर टाकल्यानंतर आराध्य गोयल (81) धावबाद झाला. त्याने चिगुरुपती व्यंकट (26) याच्यासमेवत पाचव्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली.

नंतर साई नाईक (41) याने नवव्या विकेटसाठी कर्णधार समर्थ राणे याच्यासमवेत केलेली 33 धावांची भागीदारीही गोव्यासाठी निर्णायक ठरली. त्यामुळे गोव्याला दुसऱ्या डावात द्विशतक पार करता आले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 155

सौराष्ट्र, पहिला डाव ः 146

गोवा, दुसरा डाव (4 बाद 160 वरून) ः 71.2 षटकांत सर्वबाद 216 (आराध्य गोयल 81, चिगुरुपती व्यंकट 26, साई नाईक 41, शमिक नाईक 4, द्विज पालयेकर 0, समर्थ राणे 7, ओम खांडोळकर नाबाद 0, आयुष अंधारिया 49-3, युवराज वाघेला 33-2, अर्जुन जेठवा 32-3).

सौराष्ट्र, दुसरा डाव ः 53.5 षटकांत सर्वबाद 152 (जय रवालिया 54, वेदांत जादव 73, समर्थ राणे 18-5-49-1, शमिक कामत 9-4-26-3, चिगुरुपती व्यंकट 8-1-27-0, ओम खांडोळकर 6-1-24-0, द्विज पालयेकर 12.5-2-24-5).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT