Captain Suryakumar Yadav reveal why Deepak Chahar Return Home ahead of India vs Australia 5th T20I at Bengaluru :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या टी20 मालिका सुरू असून या मालिकेतील अखेरचा आणि पाचवा टी20 सामना रविवारी (3 डिसेंबर) होत आहे. बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना होत आहे. दरम्यान, या सामन्यापूर्वीच वेगवान गोलंदाज दीपक चाहर त्याच्या घरी परतला आहे. त्याच्या घरी परतण्यामागील कारण कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे.
या सामन्यात नाणेफेकीवेळी बोलताना सूर्यकुमारने दीपक घरी परतल्याबद्दल सांगितले. त्याने सांगितले की त्याला मेडीकल एमर्जन्सी आल्याने तातडीने घरी परतावे लागले आहे. दरम्यान, दीपकच्या घरी कोणती मेडिकल एमर्जन्सी आली, याबद्दल मात्र सूर्यकुमारने खुलासा केलेला नाही.
दीपकचा या मालिकेसाठी आधी निवड झाली नव्हती. मात्र, तिसऱ्या टी२० सामन्यासाठी मुकेश कुमारने सुटी घेतली होती. त्याने लग्नासाठी सुटी घेतलेली, त्यामुळे त्याच्या जागेवर दीपकला संघात सामील करण्यात आले होते. तसेच मुकेश चौथ्या टी२० सामन्यासाठी परत आल्यानंतरही दीपकला संघात कायम करण्यात आले होते.
त्यामुळे चौथ्या टी20 सामन्यात दीपक प्लेइंग इलेव्हनमध्येही खेळला. त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या. त्याने ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हिड आणि मॅथ्यू शॉर्ट यांना बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतील पाचव्या सामन्यातून दीपक बाहेर गेल्याने त्याच्या जागेवर प्लेइंग इलेव्हनमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचे पुनरागमन झाले आहे. हा एकमेव बदल भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये झाला आहे.
पाचव्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही एक बदल करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाने ख्रिस ग्रीनच्या जागेवर नॅथन एलिसला संधी दिली आहे.
भारत - यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलिया - ट्रॅव्हिस हेड, जोश फिलिप, बेन मॅकडरमॉट, ऍरॉन हार्डी, टिम डेव्हिड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू वेड(यष्टीरक्षक/कर्णधार), बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जेसन बेऱ्हेनडॉर्फ, तन्वीर संघा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.