Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : गोव्यात मुख्यमंत्र्यांची मनमानी सुरु; लवकरच सत्ताबदल होणार

नीती आयोगाच्या अहवालावरून विजय सरदेसाईंनी केले मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना केले लक्ष्य

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai : गोव्यात सत्ताबदलाची गरज असून बरेचजण मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. गोव्यात मुख्यमंत्री मनमानी करत असून त्यांना कुणीही याबाबत विचारणा करण्यास तयार नाही. मात्र, गोव्यात सत्ताबदलाचे वारे वाहू लागले असून संधी मिळाल्यास विश्वजीत राणे,  दिगंबर कामत  हे दोघेही या पदावर दावा करू शकतात, असेही सरदेसाई यावेळी म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गेलेले असतानाच नीती आयोगाने सादर केलेल्या अहवालावरून गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी त्यांना लक्ष्य करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिवाय विश्वजीत राणे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

नीती आयोगाची आकडेवारी चुकीची असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा सरदेसाई यांनी पुरता समाचार घेतला. गोव्याचा मुख्यमंत्री बदलण्याची गरज असून विश्वजीत राणे हे निश्चितच या पदासाठी योग्य असल्याचा पुनरूच्चार सरदेसाई यांनी केला.

मुख्यमंत्री सावंत नीती आयोगाने दिलेली आकडेवारी खोटी म्हणून आपले अपयश लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. गोव्यात 1 लाखांहून अधिक बेरोजगार असल्याची आकडेवारी सांख्यिकी खात्याने जाहीर केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना तेवढेही माहीत नसावे, हे दुर्दैव असल्याचा टोला  सरदेसाई यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री केवळ सगळे आपल्या हातात यावे, यासाठी आग्रही असतात. मात्र, सर्वसामान्य गोवेकरांच्या प्रश्नांचे त्यांना काहीही पडलेले नाही. गोव्यात नुकत्याच आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याला 20 हजार तरुणांनी नोंदणी केली आणि तेवढेच गोव्यात बेरोजगार आहेत, हा मुख्यमंत्र्यांचा तर्क चुकीचा असून त्यांनी वक्तव्य करण्याआधी माहिती घ्यावी, असा सूचक सल्लाही सरदेसाई यांनी दिला.

विश्वजीत राणे हे  मुख्यमंत्री पदासाठी योग्य म्हणत असतानाच सरदेसाईंनी त्यांच्यावरही चांगलीच टीका केली आहे. राणे यांना रिजनल प्लॅनिंग म्हणजे जमत नसल्याचे खुद्द नीती आयोगच सांगतो. मात्र, प्रमोद सावंत यांच्यापेक्षा विश्वजीत राणे हे मुख्यमंत्री पदासाठी योग्य असल्याचे सरदेसाई यांनी आज ठासून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT