Vijai Sardesai
Vijai Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai on Ration Scam : गोव्यात लुटारुंसाठी 'All is Well'; धान्य घोटाळ्यावरुन सरदेसाईंची बोचरी टीका

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात अन्नपुरवठा विभागाने धडक कारवाई करत राज्यात ठिकठिकाणी धाड टाकली. यात मोठ्या प्रमाणात धान्यसाठाही जप्त करण्यात आला आहे. गोव्यातील रेशनसाठी गोदामात साठवलेले धान्य कर्नाटकमध्ये तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आता गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आतातरी मुख्यमंत्री घोटाळेबाजांवर कारवाई करणार का असा संतप्त सवाल सरदेसाईंनी विचारला आहे.

एकीकडे कर्नाटकने म्हादईचं पाणी पळवण्याचा घाट घातला आहे, तर दुसरीकडे गरिबांसाठी आलेलं धान्यही कर्नाटकमध्ये पळवणं ही गंभीर बाब आहे. तूरडाळ आणि साखर घोटाळ्यावेळी आपण पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली होती. मात्र सरकारने घोटाळेबाजांवर कोणतीही कारवाई केली नाही. केवळ सिद्धीविनायक नाईक यांना निलंबित करुन सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र असे प्रकार सातत्याने गोव्यात होत आहेत. मुख्यमंत्री आतातरी कारवाई करणार आहेत की भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालणार असा सवालच सरदेसाईंनी विचारला आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मागच्या वेळी सिद्धीविनायक नाईक यांच्यावर कारवाई करत त्यांना निलंबित केलं होतं. आता या प्रकरणात मुख्यमंत्री आयुक्त संजीत रॉड्रिग्ज यांच्यावर कारवाई करणार का असा सवाल सरदेसाईंनी उपस्थित केला आहे. अन्नपुरवठा मंत्री रवी नाईक यांनी याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. शाहजहान असो किंवा अन्य कुणी, जो घोटाळा करतो त्यावर कारवाई झालीच पाहिजे. कारण गोव्याची जनता सर्व पाहते आहे, असंही सरदेसाईंनी म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa And Kokan Today's Live News: पेडणे खून प्रकरण; आजगावकर यांचा सखोल चौकशी करण्याची मागणी

Dengue News : डेंग्यू निर्मूलनासाठी लोकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे : आरोग्य उपसंचालक डॉ.कल्पना महात्मे

Lairai Devi jatra 2024 : ‘लईराई’चा कौलोत्सव अभूतपूर्व उत्साहात; शिरगावात भक्तिमय वातावरण

Cashew Production Declined: काजू पीक घटले; दारूभट्ट्या थंडावल्या, हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Cashew Agriculture : गोव्यातील काजूचे प्रस्‍थ

SCROLL FOR NEXT