Goa Forward Party | Vijai Sardesai Dainik gomantak
गोवा

Vijai Sardesai : ...इस्पितळ खाजगी कंपनीला दिल्यास आंदोलन : सरदेसाई

हे इस्पितळ एम्सने ताब्यात घ्यावे : सरदेसाई

दैनिक गोमन्तक डिजिटल

Vijai Sardesai : दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स सुरू करावे, यासाठी आपण नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेतली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ खाजगी कंपनीद्वारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा राज्य सरकारचा घाट आहे, हे त्यांच्या कानावर घातले.

‘एम्स’ इस्पितळ सुरू केले नाही व खाजगी कंपनीला इस्पितळ दिले, तर आपण स्वस्थ बसणार नाही. संपूर्ण दक्षिण गोव्यात त्यासाठी आंदोलन सुरू केले जाईल, असेही आपण केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.

हे इस्पितळ दक्षिण गोव्यातील मडगाव, फोंडा, काणकोण, सांगे येथील नागरीकांना सुद्धा उपयुक्त आहे. मात्र येथे योग्य सुविधा नाहीत, त्यामुळे कित्येकदा रुग्णाला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात न्यावे लागते.

या इस्पितळात वैद्यकीय सुविधा वाढविणे किंवा पात्र डॉक्टरांची नियुक्ती करण्यापेक्षा येथे खाजगी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे कोणालाही परवडणारे नाही, असे आपण त्यांना सांगितले. त्यामुळे हे इस्पितळ एम्सने ताब्यात घ्यावे, असे आपण त्यांना सुचविल्याचे सांगितले.

‘एम्स’साठी सुविधा उपलब्ध

एम्स’ इस्पितळासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत, काही सुधारणा करावी लागेल, तरीसुध्दा लोकांना स्वस्त व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होईल, असे आपण त्यांच्या कानावर घातले आहे. शिवाय देशात एम्सची संख्या वाढविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT