Vijai Sardesai allegations on Vishwajit Rane and Ravi Naik: गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी कृषी मंत्री रवी नाईक आणि वन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर टीका केली आहे. विधानसभा अधिवेशनात दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
गत आठवड्यात विधानसभा अधिवेशनात बोलताना कृषी मंत्री रवी नाईक यांनी जंगलातून मानवीवस्तीत येणाऱ्या प्राण्यांबाबत मिष्किल भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, प्राणी सरकारच्या प्रेमात का पडली आहेत? कारण सरकारचे जनावरांवर प्रेम आहे.
त्यावर फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी विधानसभेतदेखील प्राणी आलेत, असा टोला त्यांना लगावला आहे.
सरदेसाई म्हणाले की, जेव्हा प्राण्यांचा अधिवास नष्ट होतो, तेव्हा ते शहराकडे जाणे स्वाभाविक आहे. नुकतीच लागलेली आग ही प्राण्यांच्या अधिवासाच्या दुरवस्थेचे उत्तम उदाहरण आहे. वस्तीत जनावरे खाली येण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही.
मी मंत्री असताना आम्ही जंगलात चेकडॅम बनवले होते त्यामुळे जनावरांना पुरेसे पाणी मिळत होते. मुख्यमंत्री म्हणतात की, जंगलातील आग मानवनिर्मित आहे. पण ती कुणी लावली हे समोर आलेले नाही.
सरदेसाई म्हणाले की, गोवा फाऊंडेशनने 45 हजार कोटींचा खाण घोटाळा उघडकीस आणला आणि आता वन मंत्री त्यांच्यावर आरोप करत आहेत. मला वाटते मंत्र्यांचा जिभेवरचा ताबा सुटला. गोव्यातील जनतेला माहित आहे की, गोव्यातील लोकांसाठी कोण लढतंय.
कदाचित मंत्री नाराज झाले आहेत आणि संतापले आहेत. म्हादई अभयारण्य व्याघ्र प्रकल्प म्हणून अधिसूचित करा, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे आणि आपण त्याचा आदर केला पाहिजे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.