Goa Forward Party President Vijay Sardesai Dainik Gomantk
गोवा

Goa Forward Party : गोवा फॉरवर्डचा ‘नारळ’ लवकरच कॉंग्रेसच्या हातात

विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास विचार करू; विजय सरदेसाईंचे सूचक विधान

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Forward Party : पक्षाच्या दोन तृतीयांश फुटीनंतर अद्यापही न सावरलेला काँग्रेस आता बळकटीकरणासाठी प्रयत्नशील झाला आहे. यासाठी पक्षांतर्गत बैठकांची सत्रे सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर विविध नेत्यांशी चर्चा करत आहेत. आज तातडीने काँग्रेसने आपला विधिमंडळ पक्षाचा नेताही जाहीर केला. तर दुसरीकडे आमदार कार्लुस फेरेरा यांनी विजय सरदेसाई यांनी आपला गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. तसे झाल्यास काँग्रेसला बळकटी येईल, असे विधान केले आहे. यावर, तसा प्रस्ताव आल्यास आपण जरूर विचार करू, असे सूचक विधान गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी केले आहे.

मागील आठवड्यात 14 सप्टेंबरला काँग्रेसला त्यांच्याच आठ आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर करून जबरदस्त दणका दिला होता. या मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी उर्वरित नेत्यांनी प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. काल (सोमवारी) रात्री पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी गोवा विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी युवा आमदार आणि विद्यमान कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांची निवड जाहीर केली आहे.
तर दुसरीकडे पक्षाचे आमदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ कार्लुस फेरेरा यांनी विजय सरदेसाई यांनी आपला गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा. तसे झाल्यास पक्षाला आणि गोवा फॉरवर्डलाही फायदा होईल आणि पक्ष बळकटीला मदत होईल, असे म्हटले आहे. यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून तसा प्रस्ताव आल्यास विचार करू, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे. एकूणच या विलिनीकरणाला सकारात्मक दिशा मिळताना दिसत आहे. अर्थात, असा प्रस्ताव गेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रारंभी गोवा फॉरवर्डला कॉंग्रेसने दिला होता. मात्र, त्यांनी तो नाकारला होता, हे विशेष.

दरम्यान विजय सरदेसाई हे मूळ काँग्रेसच्या विचारधारेचेच असून ते अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी आपला गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केल्यास काँग्रेसला बळकटी आणि खंबीर नेतृत्वही मिळेल, असा विश्वास काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांनी व्यक्त केला. तर एखादा पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणे, ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अवघड आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या हायकमांडकडून तसा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करू. सध्या तरी अशा प्रकारचा कोणताच प्रस्ताव आलेला नाही, असं स्पष्टीकरण गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी दिलं आहे.
विधिमंडळ गटनेतेपदी युरी
पक्षविरोधी कारवाया केल्याचे कारण देत काँग्रेसने आपले विधिमंडळ गटनेते आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या विरोधात विधानसभा सभापती रमेश तवडकर यांच्याकडे तक्रार करत त्यांची या पदावरून हकालपट्टी केली होती. नंतर लोबो यांनी काँग्रेसच्या अन्य सात आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांची पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड केली. तसा प्रस्तावही विधानसभा सभापतींकडे पाठवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT