Vijai Sardesai has alleged that the Goa Government is all set to extend the revenue holiday granted to GMR up to December 2024  Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: मोपा विमानतळ चालवणाऱ्या कंपनीवर सावंत सरकार 'मेहरबान', शिजतोय मोटा कट; विजय सरदेसाईंचा घणाघात

Vijai Sardesai: एका खासगी कंपनीला फायदा करून देण्‍यासाठी केला जाणारा हा महाघोटाळा आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport: मोपा विमानतळ चालविणाऱ्या ‘जीएमआर’ कंपनीला देण्‍यात आलेल्‍या महसूल सुटीचा कालावधी वाढवून देण्‍यासाठी गोवा सरकारने गुपचूपरित्‍या प्रयत्‍न सुरू केल्‍याचा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाने केला आहे. हा कालावधी वाढवून दिल्‍यास गोवा सरकारला २२० कोटींच्‍या महसुलाला मुकावे लागणार आहे. एका खासगी कंपनीला फायदा करून देण्‍यासाठी केला जाणारा हा महाघोटाळा आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

सरदेसाई यांनी केलेल्‍या दाव्‍याप्रमाणे, डिसेंबर महिन्‍यापर्यंत जीएमआरला महसूल सूट वाढवून देण्‍याचे कारस्‍थान शिजत असून हा कालावधी मार्च २०२५ पर्यंत वाढविण्‍याची तरतूद या प्रस्‍तावात केली जाणार आहे. हा निर्णय मुळात गोव्‍याच्‍या विरोधी असून राज्याच्या आर्थिक आरोग्यासाठी तो हानिकारक आहे असे मत व्‍यक्‍त करत या प्रस्‍तावित महसूल सूट कालावधी वाढीला सरदेसाई यांनी विरोध केला आहे.

जीएमआर आणि गोवा सरकार यांच्‍यात झालेल्‍या कराराप्रमाणे, मे २०२४ पर्यंत जीएमआर कंपनीला महसुलातील वाटा गोवा सरकारला देण्‍यापासून सूट दिली होती. मूळ कराराप्रमाणे, एकूण महसुलातील ३६.९९ टक्‍के महसूल राज्‍य सरकारला देण्‍याची तरतूद आहे. सध्‍या मिळत असलेल्‍या माहितीप्रमाणे, एका आर्थिक वर्षात जीएमआरला मोपा विमानतळापासून ५९६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्‍त होत आहे. त्‍याचे ३६.९९ टक्‍के मूल्‍य २२० कोटी रुपये एवढे होते.

मे २०२४ नंतर जीएमआर कंपनीला गोवा सरकारला महसुलातील भागीदारी देणे बंधनकारक आहे. हा भागीदारीचा हिस्‍सा राज्‍य सरकारला मिळेल असे आश्‍‍वासन यापूर्वी सभागृहाला दिले असूनही, हा कालावधी डिसेंबर २०२४ पर्यंत वाढवण्यासाठी आता मंत्रिमंडळ स्‍तरावर गुप्त प्रयत्न सुरू आहेत. जीएमआरला फायदा व्‍हावा यासाठी हा प्रस्‍ताव नागरी विमान वाहतूक विभागाऐवजी बाहेरच्‍या बाहेर कॅबिनेट नोट तयार करून प्रस्‍तावाला मंजुरी देण्‍याचे कारस्‍थान शिजत असल्‍याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे.

‘पीएमओ’कडे तक्रार करणार

हा निर्णय पुढे नेल्‍यास सरकारी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. हा एक महाघोटाळा आहे. त्‍याबाबत आम्‍ही पंतप्रधान कार्यालयासह, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक मंडळ आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशारा विजय सरदेसाई यांनी दिला आहे.

विजय सरदेसाई, अध्‍यक्ष (गोवा फॉरवर्ड)

अशी मुदतवाढ देणे चुकीचे आहे. यामुळे सरकारी तिजोरीचे फार मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. शिवाय सभागृहाच्या विशेषाधिकारांचेही थेट उल्लंघन केल्‍यासारखे होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bhutani Project: 'भूतानी'विरुद्ध गोमंतकीयांची एकजूट! आंदोलनातून देणार इशारा; उपोषणाला राज्यातून वाढता प्रतिसाद

Goa Drugs Case: पोलिसांच्या सापळ्यात अडकला ड्रग्ज विक्रेता! साडेसहा लाखांचे चरस हस्तगत; झारखंडच्या तरुणास अटक

Rashi Bhavishya 27 October 2024: विवाहाचा विषय मार्गी लागेल,धनलाभ देखील होईल; आजचा दिवस अत्यंत महत्वाचा

Content Creators Fair Goa: लाखो कमवण्याचा फंडा; एम. एस. धोनीने कंटेंट क्रिएटर्संना दिला लाखमोलाचा कानमंत्र

Goa Crime: फुलांच्या विक्रीवरुन हाणामारी, सुरी हल्ल्यात दोघेही जखमी; कोलवाळ-चिखली जंक्शनवरील घटना

SCROLL FOR NEXT