vijay sardesai Dainik Gomantak
गोवा

Cash For Job Scam: सरकारी नोकरी घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT स्थापन करा; सरदेसाईंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Vijai Sardesai: सरकारी नोकरी देण्यासाठी लोकांकडून लाखो रुपये उकळण्याची नव नवीन प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत.

Manish Jadhav

मडगाव: सरकारी नोकरी देण्यासाठी लोकांकडून लाखो रुपये उकळण्याची नव नवीन प्रकरणे उघडकीस येऊ लागली आहेत. याच पार्श्वभूमीवर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करावी आणि या पथकाच्या चौकशीचा अहवाल येईपर्यंत सर्व नोकरभरती प्रक्रियेला रोख लावण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सखोल तपासाची गरज

दरम्यान, आज (4 नोव्हेंबर) सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, गोव्यात लागोपाठ जी प्रकरणे उघडकीस आली आहेत त्यावरुन याच्या पाठीमागे मोठं रॅकेट काम करत असेल. या रॅकेटमध्ये सरकारी अधिकाऱ्यासह लोक प्रतिनिधीही असू शकतात. त्यामुळे तात्काळ या प्रकरणांचा सखोल तपास करण्यात यावा.

एसआयटी स्थापन करा

या एसआयटी पथकात गोव्या बाहेरील तज्ज्ञांची नेमणूक करावी आणि या पथकाला चौकशीसाठी संपूर्ण मोकळीक द्यावी असे सरदेसाईंनी म्हटले. हा घोटाळा सरकार पुरस्कृत तर नाही ना यावरही मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणीही सरदेसाईंनी यावेळी केली. यापूर्वी, सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरीसाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला होता. या प्रकाराची सखोल चौकशी होईपर्यंत नोकर भरती प्रक्रिया स्थगित ठेवावी अशी मागणी त्यांनी त्यावेळी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे काणा डोळा करीत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Economy: पैसाच पैसा! Per Capita Income मध्ये गोव्याने पटकावला दुसरा क्रमांक; मग पाहिलं कोण?

Pooja Naik: Pooja Naik: पूजा नाईकच्या अडचणीत वाढ; म्हार्दोळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा

Goa Live Updates: बेकायदेशीर घरांचे वीज व पाणी 'कनेक्शन कट'!

Dudhsagar Tourism: 'दूधसागर'ला पर्यटकांचा गोंधळ! तोबा गर्दीमुळे जीप पडल्या अपुऱ्या; संख्या वाढवण्याची मागणी

Leopard In Goa: सत्तरीत बिबट्याचा थरार! घराच्या अंगणात वाढला संचार; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT