Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai : ज्येष्ठांच्या पेन्शनच्या पैशातून कंत्राटदारांची बिले

गोवा सरकारच्या नाकर्तेपणावर कडाडून टीका

दैनिक गोमन्तक

मडगाव : स्व. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना दयानंद निराधार योजनेखाली ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन दिली जायची. त्याचे पैसे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा व्हायचे. मात्र, आताचे सरकार त्यांची पेन्शन पाच - सहा महिने अडवून ठेवत आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रती दाखविलेली सरकारची ही असंवेदशीलता असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डचे सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांनी केला.

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त आज मडगाव येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारच्या समाजकल्याण खात्याला या ज्येष्ठ नागरिकांप्रती काहीच पडून गेलेले नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनचे पैसे कंत्रादारांची बिले फेडण्यासाठी वापरले जात आहेत. कारण या कंत्रादारांकडून काहीजणांना कमिशन मिळते. त्यासाठीच ज्येष्ठांची परवड केली जात आहे, असाही आरोप त्यांनी केला.

समाजकल्याण खात्यावर ताशेरे ओढताना सरदेसाई म्हणाले, वृद्धाश्रमात अटेंडंट म्हणून काम करतात त्यांचा पगार चार हजारावरून अडीच हजारावर आणण्याचे ठरले आहे आणि साफसफाई करणाऱ्यांना अडीच हजार मानधन मिळत होते ते दीड हजारांवर आणू पाहात आहेत. एका बाजूने महागाई वाढत असताना मानधन वाढविण्याचे सोडून हे सरकार त्यांचा पगार कमी करू पाहात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT