Vijai Sardesai alleges on Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजकीय स्वार्थासाठी म्हादई विकली का ?

अन्यथा कर्नाटकने सुरू केलेले काम बंद करा; सरदेसाई संतापले

दैनिक गोमन्तक

मडगाव: कर्नाटक राज्याने म्हादई खोऱ्यात पाणी वळविण्यासाठी यंत्रसामग्री आणून ठेवली असून त्यांनी कामही सुरू केले आहे. अशा आशयाचे वृत्त वृत्तपत्रात प्रसिद्ध होऊनही गोवा सरकारने त्यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी म्हादई कर्नाटकला विकली का? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

( Vijai Sardesai Allegations Chief Minister Pramod Sawant on Mahadayi River Case )

म्हादई गोव्याची जीवनदायिनी आहे. पण गोवा सरकारला त्याचे काहीच नाही. सावंत यांना म्हादई खरीच आपली आईं वाटत असेल तर त्यांनी पोलिसांना घेऊन संपूर्ण गोव्यात फिरण्याऐवजी जिथे काम चालू आहे तिथे स्वतः जाऊन पाहणी करून हे चालू झालेले काम बंद पाडावे अन्यथा आपण म्हादईचा कर्नाटकशी सौदा केला हे जाहीर करावे असे आव्हान त्यांनी केले आहे.

यापूर्वी म्हादई नदीत कर्नाटक बंधारा बांधून कर्नाटक पाणी वळवू पाहत आहे. याकडे पर्यावरण कार्यकर्ते राजेंद्र केरकर यांनी लक्ष वेधले होते. त्यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी आपण स्वतः परिस्थितीचा आढावा घेऊ असे म्हटले होते. पण मागच्या तीन महिन्यांत ते तिथे फिरकलेच नाहीत.

गोवा सरकारने कर्नाटक राज्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली असे सांगण्यात येते आहे. ती याचिकाही अजून सुनावणीस येत नाही. गोवा सरकारला म्हादईचे काहीच पडलेले नाही असा अर्थ त्यातून काढायचा का? असा सवाल सरदेसाई यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT