उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नोडा पेडणे येथील इमारतीचे उद्घाटन  Dainik Gomantak
गोवा

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नोडा पेडणे येथील इमारतीचे उद्घाटन

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा गोवा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

दैनिक गोमन्तक

गोव्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांचे काल आगमन झाले आहे. त्यांचा हा दौरा 30 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. यामुळे त्याचे स्वागत राज्यपाल पी.एस.श्रीधरन यांनी केले. यावेळी नौदल हंस तळावर त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, मुख्य सचिव परीमल राय आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विर्नोडा पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री बाबू आजगावकर, केंद्रीय पर्यटन मंत्री श्रीपाद नाईक मुख्य सचिव परीमल राय व इतर मान्यवर उपस्थित होते.

राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील अनेक दिग्गज नेते तसेच सरकारी पातळीवरील महनीय व्यक्ती या आठवड्यात गोव्यात येणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना बराच वेग येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT