Vhovyo  Dainik Gomantak
गोवा

Goan culture : धावेत जपली जाते लग्न गीतांची परंपरा; ज्येष्ठ महिलांकडून जतन

नव्या पिढीने कला आत्मसात करण्याची गरज

पद्माकर केळकर

सध्या सत्तरी तालुक्यातील गावागावांत लग्नसमारंभ मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. या लग्नाच्या आदल्या दिवशी हळदी समारंभ केला जातो. या हळदी समारंभात विविध लग्नगीते म्हणण्याची परंपरा आजतागायत सुरू आहे. ही लग्नगीते, घाणे भरणे, दिवा लावणे, तांदुळ दळणे अशी गीते म्हणण्याची परंपरा धावेतील ज्येष्ठ महिलांनी जपली आहे.

धावे सत्तरी गावातील ज्येष्ठ महिला यशोदी गोविंद कुडचिरकर, द्रौपदी मनोहर तळपी, सुमती वेळुस्कर आदींनी ही परंपरा राखली आहे. धावे गावात किंवा आजूबाजूच्या परिसरात नातेवाईक यांच्या लग्न, हळदी समारंभाला या महिला आवर्जून जातात व लोकगीतांचा आवाज बुलंद करीत आहेत.

अन्य महिलाही लोकगीते म्हणत आहेत. लहानपणी लग्नाला गेल्यानंतर तिथे चाललेल्या विधीकडे लक्ष देऊन ऐकून ऐकून अशा लोकगीतांचा अभ्यास ज्येष्ठ महिलांनी त्यावेळी केला होता. पदरात पुस्तकी शिक्षण नव्हते, पण डोक्यात एखादी गोष्ट पटकन आत्मसात करण्याची बुध्दी चातुर्यता होती.

ही परंपरा पुढेही चालू रहावी म्हणून आत्ताच्या नवीन पिढीने त्यावर अभ्यास करुन वाचन पाठांतर करुन परंपरा जपण्याची गरज आहे. नाहीतर पुढील काळात अशा परंपरा लुप्त होण्याची भीती आहे. सत्तरी तालुक्याला ऐतिहासिक, लोकसंस्कृती अशी विविध परंपरा लाभली आहे.

"आजच्या पिढीने या लोकगीतांचा अभ्यास केला पाहिजे. पूर्वापार चालत आलेली लोककला संवर्धित होण्यासाठी नवीन युवा महिलांनी, युवतींनी कला शिकून घेतली पाहिजे."

द्रौपदी तळपी

"हळदी कार्यक्रमात घाणे भरणे, करा देणे, दिवा लावणे, तांदुळ दळणे असे प्रकार असतात. त्यावेळी विविध गीते, ओव्या म्हटल्या जातात. आपल्याला अशी गीते म्हणण्याची फार आवड आहे."

सुमती वेळुस्कर

आपण आठ वर्षांची असताना लग्न समारंभात गेले की तिथे महिला म्हणत असलेल्या गीतांचे श्रवण करीत होते. असेच श्रवण करीत करीत लोकगीतांचे पाठांतर केले व आजतागायत परंपरा चालू ठेवली आहे. हळदी समारंभात आवर्जून उपस्थिती लावून गीते म्हणते.

यशोदी कुडचिरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

Rohit Sharma TV Show: क्रिकेटनंतर मनोरंजन विश्वात 'हिटमॅन'ची नवी इनिंग; रोहित शर्माचा स्वतःचा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला

Shukra Gochar 2026: कौटुंबिक सुख, रोमान्स अन् अफाट पैसा...! शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन; 5 राशींना होणार तगडा धनलाभ

Savanar Maye tree fall: सावनार-मये येथे घरावर कोसळली झाडे, दोन लाख रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान; मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT