Vernekars Family In Goa Dainik Gomantak
गोवा

Vernekars In Goa : अनेक वर्ष अमेरिकेत वास्तव्य तिथेच लग्न, वेर्णेकर कुटुंब जपतेय गोवन संस्कृती

गुरुवारी हर्तेश याची मुंज पारंपारिक पद्धतीने पार पडली

Rajat Sawant

Vernekars In Goa : अमेरिकेत स्थायिक असूनही वेर्णेकर कुटुंबाने गोवन संस्कृती जपली आहे. त्यांनी आपल्या मुलांना कोंकणी भाषेचे देखील ज्ञान दिले आहे. अमेरिकामध्ये स्थायिक सोहित वेर्णेकर या गोवन मुलाने अमेरिकेतील मुलीशी लग्न केले. सोहित वेर्णेकर व जेसिका वेर्णेकर या जोडप्याला दोन मुले आहेत.

गुरुवारी सोहित आणि जेसिका यांचा मुलगा हर्तेश याची मुंज पारंपारिक पद्धतीने पार पडली.

अमेरिकामध्ये स्थायिक असलेल्या गोव्यातील वेर्णेकर कुटूंब सोशल मिडीयावर भरपूर फेमस आहे. 'वेर्णेकर्स इन अमेरिका' या नावाने सोशल मिडियावर अकाउंट असून यावर त्यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. वेर्णेकर कुटूंब काही दिवसांपूर्वी गोव्यात आले आहे.

हर्तेशच्या मुंज कार्यक्रमाला गोव्यातील त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. मडगाव येथील एका हॉलमध्ये मुंजीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी हर्तेश भारतीय पेहरावात दिसून आला. त्याने लाल रंगाचे सोवळे परिधान केले होते. तर त्याचे वडील सोहीत वेर्णेकर यांनी जांभळ्या रंगाचे सोवळे परिधान केले होते. त्याच्या आईने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती.

सोहीत वेर्णेकर या गोवन युवकाचे शिक्षण गोव्यात झाले. त्यानंतर तो अमेरिकेत स्थाईक झाला. यानंतर सोहीतने अमेरिकन युवतीशी भारतात येत हिंदु धर्मात आई-वडिलांच्या संमतीने लग्न केले. सोहित अमेरिकेत स्थाईक झाला असला तरी त्याने अमेरिकेत गोवन संस्कृती जपली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT