Goa Tourism: गोव्यातील हॉटेलमध्ये 'या' गोष्टी सुरू करा; योगगुरू रामदेव बाबांचे गोवा पर्यटन विभागाला आवाहन

गोवा आणि उत्तराखंड सरकारच्या वतीने परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.
YogGuru Ramdevbaba And Rohan Khaunte
YogGuru Ramdevbaba And Rohan Khaunte Dainik Gomantak

Goa Tourism: 'देखो अपना देश' या उपक्रमाअंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा आणि उत्तराखंड सरकारच्या वतीने परस्पर सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. दोन्ही राज्यातील पर्यटन वाढीला सहकार्य करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आलाय.

दोन्ही राज्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी दोन्ही राज्यांमधील प्रवास सुलभ करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी योगगुरू रामदेव बाबा यांची भेट घेतली आहे. रामदेव बाबांनी यावेळी गोवा पर्यटन खात्याकडे एक मागणी केलीय.

अध्यात्म भारताची 'सॉफ्ट पॉवर' आहे. जगभरातील लोक सध्या अनुभवत असलेल्या तणाव आणि चिंता यासारख्या समस्यांवर योग हा उत्तम उपाय आहे. त्यामुळे गोव्यात पर्यटन आणि सुट्टी घालवणाऱ्यांसाठी हॉटेलमध्ये योग आणि ध्यानाचे कार्यक्रम सुरू करण्याचे आवाहन रामदेव बाबांनी केले आहे.

जग तणाव आणि चिंता यासारख्या समस्यांमधून जात आहे. मानसिक शांततेसाठी आणि निरोगीपणासाठी पर्यटन विभाग योग आणि पंचकर्म यासारख्या सुविधा सुरू करू शकते असेही बाबा रामदेव म्हणाले.

गोवा आणि उत्तराखंडला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी दोन्ही राज्यांमधील प्रवास सुलभ करणे यासाठी झालेला करार, दोन्ही राज्यांतील पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठे पाऊल असल्याचे मानले जाते.

YogGuru Ramdevbaba And Rohan Khaunte
मिरामारनंतर आता मोरजी समुद्रकिनारी कार, तेलंगणाचा चालक पोलिसांच्या ताब्यात

या सामंजस्य करारांतर्गत, दोन्ही राज्यांना उत्तराखंड आणि गोवा दरम्यान थेट उड्डाण कनेक्टिव्हिटीचा फायदा होईल, प्रवासाचा वेळ 7 तासांवरून 2.5 तासांपर्यंत कमी होईल, ज्यामुळे पर्यटकांना दोन्ही राज्यांमधील प्रवास करणे सोपे होईल.


"भारताचा समृद्ध वारसा, समृद्ध संस्कृती पाहण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. उत्तराखंड टूरिझमसोबत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करत, आम्ही अध्यात्मिक आणि इको-टूरिझमवर लक्ष केंद्रित करण्यास उत्सुक आहोत." असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com