Madkai Panchayat Chalo Abhiyan  Dainik Gomantak
गोवा

Madkai: मडकईत 'पंचायत चलो' कार्यक्रमात वाद; आरजीकडून मंत्री सुदिन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार

मडकईत 'पंचायत चलो' अभियानाअंतर्गत मंत्री विश्वजीत राणे यांच्या दौऱ्यावेळी आरजीचे कार्यकर्ते आणि मंत्री सुदीन ढवळीकर आमनेसामने आले.

Pramod Yadav

Madkai Panchayat Chalo Abhiyan

गोवा सरकारच्या वतीने राज्यात 'पंचायत चलो' अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत राज्यातील मंत्री विविध पंचायतीत जाऊन स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्यासह सरकारी योजना आणि सुविधांची माहिती दिली जात आहे.

मडकईत 'पंचायत चलो' अभियानाअंतर्गत मंत्री विश्वजीत राणे यांच्या दौऱ्यावेळी आरजीचे कार्यकर्ते आणि मंत्री सुदीन ढवळीकर आमनेसामने आले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. आरजीकडून याप्रकरणी मंत्री सुदिन यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सरकारच्या 'पंचायत चलो' अभियानाअंतर्गत मडकई मतदारसंघात मंत्री विश्वजीत राणे यांनी हजेरी लावली. सरकारच्या या कार्यक्रमात रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे कार्यकर्ते देखील उपस्थि होते.

यावेळी मंत्री विश्वजीत राणेंना नगरनियोजन विभागाचे कलम 39ए वरुन प्रश्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरजीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि मंत्री सुदीन ढवळीकरांमध्ये उडाली शाब्दीक चकमक.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे विश्वेश नाईक आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यात शाब्दिक वाद झाला. याप्रकरणी आता आरजीने पोलिसांत धाव घेतली असून, मंत्री ढवळीकरांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

वाद एवढा टोकाला गेला की यावेळी एकामेकांच्या अंगावर देखील जाण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सर्वांना रोखले.

39ए वरुन विधानसभा अधिवेशनातही आरजीने घातला होता गोंधळ

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या गोवा विधानसभेच्या अधिवेशनात नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी कलम 39ए दुरुस्ती विधेयक सादर केले. वादग्रस्त 16 बी चे पर्यायी 39ए असल्याचे वक्तव्य मंत्री राणे यांनी केले होते.

यावेळी देखील आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी 39ए ला विरोध करत सभापतींच्या वेलमध्ये घोषणाबाजी केली. तसेच, चर्चा न करता आवाजी मतदानाने विधेयक मंजूर केल्याने विरोध केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT