Michael Lobo and Sadanand Tanavade Dainik Gomantak
गोवा

गोव्यात राजकारण तापलं, तानावडे आणि लोबो आमनेसामने

लोबो यांनी 2022 विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी भाजप मधून कॉंग्रेसमध्ये उडी मारली.

दैनिक गोमन्तक

पणजी: भारतीय जनता पक्षाने (भाजप) काँग्रेसवर गोव्यात पक्षाच्या पदांचा लिलाव केल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसने विधानसभेत पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नवीन चेहरे निवडले आहेत.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना, भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी माजी मंत्री आणि विद्यमान काँग्रेस आमदार मायकल लोबो यांच्यावर जोरदार टीका केली. लोबो यांनी 2022 विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी भाजप मधून कॉंग्रेसमध्ये उडी मारली.

तानावडे म्हणाले, "पक्ष सोडणारे मायकल लोबो (Michael Lobo) यांनी तत्कालीन भाजप सरकारमध्ये मंत्री असताना पैसे कमावले, त्यांनी पैसे खर्च करण्याची क्षमता दाखवून दिली आणि त्यामुळेच त्यांना विरोधी पक्षनेते केले आहे."

यावर प्रतिक्रिया देताना लोबो म्हणाले, “भाजपच्या प्रदेशाध्यक्षाने पक्षाच्या एका माजी सहकाऱ्याबद्दल आणि मंत्र्याबद्दल असे बोलणे अशोभनीय आहे. या प्रकारच्या वक्तव्याचा पक्षावर काय परिणाम होतो हे त्यांच्या पक्षानेच ठरवावे. गोव्यातील (Goa) लोक बघत आहेत. "तानावडे मात्र पुढे म्हणाले होते की, “निवडणुकीच्या अवघ्या 15 दिवस आधी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या व्यक्तीला सीएलपी नेता बनवले जाते.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT