MLA Venzy Viegas Dainik Gomantak
गोवा

Cash For Job: 'महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आले तर...'; नोकरी घोटाळ्यांवरुन आमदार वेन्झी यांनी व्यक्त केली शंका

Venzy Viegas: नोकऱ्या विक्री घोटाळ्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना या ‘कॅश फॉर जॉब’वर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे गप्प का, असा खडा सवाल ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Venzy Viegas On Cash For Job Scam

सासष्टी: गोव्यात सरकारी नोकऱ्या विक्री घोटाळ्यांची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना या ‘कॅश फॉर जॉब’वर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सदानंद शेट तानावडे गप्प का, असा खडा सवाल ‘आप’चे बाणावलीचे आमदार वेन्झी व्हिएगस यांनी केला आहे.

या घोटाळ्यात भाजप कार्यालयाशी संबंधित पदाधिकाऱ्यांची नावे आहेत. आज, आपल्याकडे तीन गोमंतकीय शिक्षित युवक नोकरी मागण्यासाठी आले होते. त्यातील दोघांनी हल्लीच जाहीर झालेल्या मडगाव नगरपालिकेतील कारकुनाच्या पदासाठी अर्ज केले आहेत.

बाणावलीतील गेल्या अडीच वर्षांत किती युवकांना भाजप सरकारने नोकऱ्या दिल्या, याची आकडेवारी आपल्याला सांगावी. महाराष्ट्रातही भाजप सरकार सत्तेवर आले तर त्या राज्यात सुद्धा सरकारी नोकऱ्यांची विक्री होण्याची शक्यता वाटते,अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

एमकॉम पदवी प्राप्त एक मुलगी आपल्याकडे आली होती. तिच्या म्हणण्यानुसार जिथे जिथे ती जाते, तिथे ते अनुभव आहे का, अशी विचारणा करतात. अनुभव नसेल तर रोकड देण्याची भाषा करतात. आम्ही शिक्षणासाठी एवढा खर्च केलेला असताना नोकरीसाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न ही युवती

विचारते. ओर्ली येथील आदिवासी समाजातील एक युवक आला होता. सदर युवकाने आपल्याला सांगितले की, त्याने अनेक सरकारी खात्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. मात्र, अजून नोकरी नाही. केवळ रोकड दिल्यावरच सरकारी नोकरी मिळेल का, असा प्रश्न हा युवक आपल्याला विचारतो, असेही वेन्झी व्हिएगस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cabinet Decision: 'इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी'ची पुनर्रचना, राज्यस्तरीय शहरी विकास संस्थेला मंजुरी... मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय

NZ ODI Squad vs India: टीम इंडियाविरुद्ध भिडण्यासाठी न्यूझीलंड सज्ज! फिन अ‍ॅलन, लॉकी फर्ग्युसनसह अनेक खेळाडूंचं कमबॅक, पाहा संपूर्ण संघ

Government Job Fraud: दोषींची मालमत्ता जप्त करणार! तोतया आयुक्तप्रकरणी CM सावंत यांचे कडक कारवाईचे संकेत

America Mass Shooting: अमेरिकेत गोळीबाराची धक्कादायक घटना! 2 चिमुकले आणि 8 महिन्यांची गर्भवती महिला यांच्यासह 9 जणांचा मृत्यू VIDEO

Horoscope: शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस ठरणार खास! देवीच्या कृपेनं 'या' राशींच्या आयुष्यात येणार यश, धनलाभाच्या संधीही मिळणार

SCROLL FOR NEXT