Vellim Dainik Gomantak
गोवा

Vellim: वेळ्ळी पंचायत घराजवळ ‘एमआरएफ’ उभारण्यास स्थानिकांचा विरोध

पंचायत घराजवळ कचऱ्यासाठी मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) उभारण्यास वेळ्ळीतील स्थानिकांनी सक्त विरोध दर्शविला आहे.

दैनिक गोमन्तक

Vellim: पंचायत घराजवळ कचऱ्यासाठी मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) उभारण्यास वेळ्ळीतील स्थानिकांनी सक्त विरोध दर्शविला आहे. मात्र, सरपंच वीना कार्दोज यानी स्पष्ट केले आहे की उच्च न्यायालयाच्या आदेशावरूनच एमआरएफ येथे उभे करण्यात येत आहे.

एमआरएफला विरोध करताना स्थानिकांनी असे कारण दिले आहे की, पंचायत घर परिसरात लोकांची वस्ती आहे. शिवाय या वस्तीत बॅंक, चर्च व आरोग्य केंद्रही आहे. अशा परिस्थितीत एमआरएफ या भागात उभारल्यास त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सीमा कुलासो यांनी सांगितले की, वेळ्ळीतील लोकांना विकास हवा आहे; पण तो लोकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून नको. एमआरएफला विरोध करणारे निवेदन आम्ही एप्रिल-मे महिन्यामध्ये पंचायतीला सादर केले होते.

मेरी कुलासो यांनी सांगितले की, या भागात काही लोकांच्या विहिरी आहेत. त्यामुळे विहिरींचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आमचा एमआरएफला विरोध आहे.

नझिमा कायरो यांनी सांगितले की, आमच्या विरोधाला न जुमानता पंचायतीला इथेच एमआरएफची उभारणी का हवी आहे, हे कळणे कल्पनेच्या पलीकडे आहे.

ही एमआरएफ सुविधा उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच उभारली जात आहे. आम्हाला नागरिकांचे निवेदन मिळाले आहे; पण त्यात विरोध करण्यामागची कारणे नमूद करण्यात आलेली नाहीत. नागरिकांनी या संदर्भात उच्च न्यायालयाशी संपर्क साधावा, असे सरपंच वीना कार्दोज यांनी सांगितले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गोवा, मुंबईत ड्रग्ज वापरले'! रायपूरमधील 2 महिलांची कबुली; इव्हेंट कंपनीच्या माध्यमातून टेक्नो पार्ट्यांचे आयोजन

Goa Politics: खरी कुजबुज; हे नगरसेवक आहेत कुठे?

BITS Pilani: गोव्‍यातीलच 'बिट्‌स' कॅम्‍पसमध्‍ये मृत्‍यू का होतात? युवा काँग्रेसची निदर्शने, सखोल चौकशीची आपची मागणी

Colvale Jail: कोलवाळ कारागृहात छापा! 8 मोबाईलसह तंबाखू हस्तगत; तुरुंगातील रामभरोसे कारभार उघड

Advalpal: ‘तुम्‍ही करोडो कमावता, आम्‍हाला का नागवता?’ अडवलपालमधील जमीनमालकाचा खाण कंपनीला संतप्‍त सवाल

SCROLL FOR NEXT