Goa Vehicle Scrapping Policy Dainik Gomantak
गोवा

Goa Vehicle Scrap Policy: गोवेकर! वाहन स्क्रॅप केल्यावर नव्या खरेदीच्या करात 15 ते 25 टक्के सवलत

वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात 15 ते 25 टक्के सवलत मिळणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Vehicle Scrapping Policy: गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील वाहनांसाठी स्क्रॅप पॉलिसीची माहिती नुकतेच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात दिली होती. पॉलिसीअंतर्गत 15 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची सर्व जुनी वाहने मोडीत काढावी लागणार आहेत.

गोवा सरकारने याबाबत एक अधिसूचना जारी केली असून, वाहने स्क्रॅप केल्यावर मालकाला नवीन वाहन खरेदीवर मोटार वाहन करात 15 ते 25 टक्के सवलत मिळणार आहे.

वाहतूक खात्याने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना आठ वर्षांपर्यंत आणि इतर वाहनांच्या बाबतीत पंधरा वर्षांपर्यंत कर सवलत मिळणार आहे. आठ आणि पंधरा वर्षानंतर करात कोणतीही सवलत मिळणार नाही.

वाहन स्क्रॅपिंगसाठी दिलेल्या व्यक्तीला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

अधिसूचनेनुसार, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांना करात 15 टक्के सवलत किंवा ठेव प्रमाणपत्रावर दर्शविल्यानुसार वाहनाच्या स्क्रॅप मूल्याच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल ते मिळणार आहे.

तर, सार्वजनिक वाहतुकीत नसलेल्या वाहनांना 25 टक्के किंवा वाहनाच्या स्क्रॅप मूल्याच्या 50 टक्के किंवा ठेव प्रमाणपत्रावर दर्शविल्याप्रमाणे जे कमी मूल्य असेल ते दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT