Vegetables have become expensive
Vegetables have become expensive Dainik Gomantak
गोवा

भाजीपाल्याचे भाव गगनाला; मासोळी मात्र स्वस्त...

दैनिक गोमन्तक

Canacona: राज्यात सामान्य जनतेला सध्या शीतकढी स्वस्त तर भाजी महागडी ठरली आहे. आवक मंदावल्याने भाज्यांचे ((Vegetable) दर गगनाला भिडले आहेत. सर्वच भाज्यांचे दर प्रति किलो 50 रुपयांनी महागले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांबरोबरच हॉटेल व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

बटाटे, टॉमेटो, वालपापडी, चिटकीमिटकी, कोबी, वांगी, भेंडी आणि अन्य भाजीचे दर प्रतिकिलो 90 रुपयांपेक्षा जाास्त झाले आहेत. काणकोण तालुक्याबरोबरच उर्वरित गोवा हा बेळगाव, हुबळी भागातून येणाऱ्या भाजीवर अवलंबून आहे. मात्र, अवकाळी पावसाने भाजी कुजल्याने आवक मंदावली आहे. सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत.

बेळगाव, हुबळी या बाजार पेठेतून भाजीची आवक होत नाही. त्याला चोर्ला व अनमोड घाटातील रस्त्याची दुरवस्थेची भर पडली आहे. कुजलेला भाजीपालाही चढ्या भावाने खरेदी करावा लागत असल्याचे चावडी येथील विक्रेत्यांनी सांगितले. काणकोणात (Canacona) आठवडी बाजारात भाज्यांचे दर चढेच राहिले. राज्य फलोत्पादन महामंडळातर्फे राज्यातील विविध भागात भाजी विक्री कक्ष सुरू आहेत. त्या कक्षानांही नियमित भाजी पुरवठा होत नाही.

मासळीची मुबलक उपलब्धता

भाजीपाल्याच्या उलट परिस्थिती मासळीच्या (Fish) उपलब्धतेविषयी व दराच्या बाबतीत आहे. काणकोणात गेल्या पंधरा दिवसांपासून बंफर बांगड्याची मासेमारी होत आहे. त्यामुळे शंभर रूपये बारा ते चौदा व बागडूल्या शंभर रुपयांना 25 ते 30 नग देण्यात येतात. तारले शंभर रुपयांना 25 ते 30 तारल्याचा वाटा, व्हिसवण 450 ते 500 रूपये किलो, कोळंबी 300 रूपये किलो. मासळीची मुबलक उपलब्धता सध्या काणकोणात आहे. भाजीपाला महागल्याने सामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT