Goa News: राज्यात मागील दोन महिनाभरापासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंच्या किंमत गगनाला भिडल्या आहे. टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांना टॉमेटो खरेदी करताना दोनदा विचार करावा लागत आहे.
पणजी बाजारात टोमॅटो ८० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे त्या सोबतच जुना कांदा ८० रुपये व इतर नवा कांदा ६० रुपये प्रती किलो दराने विकला जात आहे. लसणाच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मध्यम आकाराचा लसूण ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. जवारी लसूण ६०० रुपयांपर्यंत विकला जात आहे. पालेभाज्या तसेच फळभाज्यांच्या किमतींमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.
उत्तम आरोग्यासाठी फळे देखील खरेदी करणे मध्यमवर्गीयांना आता परवडेनासा झाले आहे. सर्वसामान्य नागरिक महागाईच्या भडक्यात होरपळू लागला आहे. येत्या दिवाळीपर्यंत कांद्याचे तसेच टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेलेच असणार असल्याचे विक्रेते सांगतात. राज्यात भाजीपाला बेळगावहून आयात केला जात असल्याने विक्रेत्यांचा वाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत महागाईत वाढ झाली आहे. तुटपुंजा पगार असणाऱ्यांचे महागाईने कंबरडे मोडले आहे.
बाजारात चिबूड, काकडी, दोडकी, भोपळा तसेच इतर भाज्या येऊ लागल्या आहेत. मध्यम आकाराचा चिबूड १०० ते १२० रुपयांना तर मध्यम आकाराची काकडी ५० ते ६० रुपये दराने विकली जात आहे. कणगी देखील बाजारात दाखल झाली असून २०० रुपये प्रतिकिलो भाव आहे. सध्या सण-उत्सवाचे दिवस असल्याने स्थानिक भाज्यांची मागणी वाढली आहे.
भेंडी .................४९........................... ८०
कोबी................ ३०........................... ४०
गाजर ................ ५३........................... ७०
फ्लॉवर ...............३९........................... ५०
बीन्स .................९० ............................१२०
हिरवी मिरची.......... ३८ ........................७०-१००
कांदा................. ५१ ............................७०-८०
बटाटा .................४१............................ ५०
टोमॅटो .................८१ ............................१००
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.