Vedanta Mining Ore Transport Bicholim Dainik Gomantak
गोवा

Goa Mining Issue: 22 दिवसानंतर गुंता सुटला, 'वेदांता'ची खनिज वाहतूक सुरु; कायमचा तोडगा काढण्याची मागणी

Vedanta Mining Ore Transport Bicholim: कामगार आणि ट्रकमालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडून त्यांना मागणीचे निवेदन दिले.

गोमंतक ऑनलाईन टीम

Vedanta Mining Ore Transport Bicholim

डिचोली: खनिज वाहतुकीवरून निर्माण झालेला गुंता अखेर २२ दिवसानंतर सुटला असून, वेदांताची वाहतूक सुरु झाली आहे. ट्रकमालकांसह कामगारांनी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची शुक्रवारी भेट घेत, याप्रकरणी कायमाचा तोडगा काढण्याची विनंती केली होती.

खनिज वाहतुकीचा गुंता सुटता सुटत नसल्याने ट्रकमालकांसह 'वेदांता'च्या कामगारांची अस्वस्थता वाढली होती. खनिज वाहतूकप्रश्नी कायमचा उपाय काढा आणि आम्हाला संकटातून बाहेर काढा, अशी मागणी ट्रकमालकांसह कामगारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

कामगार आणि ट्रकमालकांनी उपजिल्हाधिकाऱ्यांसमोर आपली कैफियत मांडून त्यांना मागणीचे निवेदन दिले.

डिचोली ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम (सतीश) गावकर आणि कामगार युनियनचे सरचिटणीस आत्माराम तिळवे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आणि ट्रकमालकांनी उपजिल्हाधिकारी कासकर यांची भेट घेतली.

खनिज वाहतूकप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांचे प्रयत्न सुरू आहेत, असे उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगून याप्रश्नी सर्वमान्य तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली होती. अखेर २२ दिवसानतंर या समस्येवर तोडगा निघाला आहे.

ट्रकांची ये-जा सुरु

डिचोलीतील खनिज वाहतुकीचा गुंता अखेर सुटल्यातच जमा आहे. आज सायंकाळपासून खनिज वाहतूक सुरू झाली असून तब्बल २२ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर डिचोलीत खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांची धडधड सुरू झाली आहे. खनिज वाहतुकीसाठी सार्वजनिक रस्ता वापरण्यास मान्यता मिळाल्याने 'वेदांता'च्या खनिज वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. पिळगाव जंक्शनवरून सार्वजनिक रस्त्याने ही खनिज वाहतूक सुरू झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT