vedanta truck mining transport  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: शेतकऱ्यांनी सहकार्य करावे! ट्रकमालकांचे आवाहन; आंदोलनकर्ते तूर्त शांत

Bicholim Mining: २२ दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर कालपासून ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरू झाली आहे. जवळपास ५० ट्रीप खनिज वाहतूक करण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Vedanta Mineral Truck Transportation Bicholim

डिचोली: डिचोलीतील ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू असून शनिवारी दुसऱ्या दिवशी बहुतेक सर्व ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले होते. दुसऱ्या बाजूने आंदोलनकर्ते शेतकरी अजून तरी शांत आहेत.

कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होता कामा नये, यासाठी कालच्याप्रमाणे आजही खनिज वाहतुकीच्या मार्गावर पोलिस तैनात करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांतर्फे न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

२२ दिवसांच्या ‘ब्रेक’नंतर कालपासून ‘वेदांता’ची खनिज वाहतूक सुरू झाली आहे. काल जवळपास ५० ट्रीप खनिज वाहतूक करण्यात आली होती. आज (शनिवारी) दुसऱ्या दिवशी सर्व म्हणजेच १७५ ट्रक खनिज वाहतुकीसाठी रस्त्यावर उतरले होते. विश्रांतीची वेळ वगळता सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खनिज वाहतूक करण्यात आली. धूळ प्रदूषण टाळण्यासाठी ठरावीक वेळेत खनिज वाहतुकीच्या रस्त्यावर झाडलोट करण्यात येत होती. पर्याय असला, तरी रात्रीच्यावेळी मात्र अजून खनिज वाहतूक करण्याचा निर्णय ट्रकमालकांनी घेतलेला नाही.

सहकार्याची अपेक्षा

खनिज वाहतूक कधी सुरू होणार, याची ट्रकमालकांना प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा संपली असून, आता ही खनिज वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार, अशी आशा आहे. नियम पाळून खनिज वाहतूक करण्यासाठी ट्रकमालकांचे प्रयत्न असणार आहेत. शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे. शेतकऱ्यांचे रास्त प्रश्न सुटावेत, अशी ट्रकमालकांचीही इच्छा आहे, असे डिचोली ट्रकमालक संघटनेचे सरचिटणीस सुभाष किनळकर आणि अन्य ट्रकमालकांनी म्हटले आहे.

वाहतूक बेकायदेशीरच!

खनिज वाहतुकीनंतर आंदोलनकर्ते शेतकरी आक्रमक होणार, अशी एक शक्यता होती. मात्र, अजूनतरी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला नाही. अंतिम परवानगी मिळाली नसतानाही बेकायदेशीरपणे सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्यात येत आहे, असा दावा अनिल सालेलकर आणि अन्य शेतकऱ्यांनी केला आहे. न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच शेतकरी पुढील पावले उचलणार, असेही या शेतकऱ्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT