Vathadev Road  Dainik Gomantak
गोवा

Vathadev Road : वाठादेव मुख्य रस्त्यावर विक्रेत्यांचे पुन्हा अतिक्रमण; वाहनचालकांचा प्रश्न

Vathadev Road : गेल्यावर्षी या रस्त्यावर मासळी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले होते. मात्र, कारापूरचे तत्कालीन सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर मासळी विक्रेत्यांना तेथून गाशा गुंडाळावा लागला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Vathadev Road :

डिचोली, वाठादेव - सर्वण भागात मुख्य रस्त्यावर पुन्हा एकदा विक्रेत्यांचे आक्रमण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य महामार्गाअंतर्गत रुंदीकरण केलेल्या झांट्ये महाविद्यालय परिसरातील रस्त्यावर सध्या फळभाजी विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे.

गेल्यावर्षी या रस्त्यावर मासळी विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढले होते. मात्र, कारापूरचे तत्कालीन सरपंच दत्तप्रसाद खारकांडे यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर मासळी विक्रेत्यांना तेथून गाशा गुंडाळावा लागला होता.

त्यानंतर गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाठादेव परिसरात रस्त्यावर बसण्याचे धाडस विक्रेत्यांनी केले नव्हते. मात्र, आता फळभाजी विक्रेत्यांनी आपला मोर्चा या रस्त्यावर वळवला आहे. वाहतूक सुरक्षित व्हावी आणि रस्त्यावरील अपघात टाळावेत. या उद्देशाने वाठादेव येथे रस्त्याचे रुंदीकरण केले असले, तरी विक्रेत्यांचे अतिक्रमण पाहता रस्ता रुंदीकरण नेमके कोणासाठी? असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.

अपघाताची भीती

रुंदीकरण केलेल्या रस्त्यावरच फळभाजी विक्रेते बसतात व रस्त्यावरून ये-जा करणारे ग्राहकही रस्त्यावरच वाहने उभी करून फळभाजी खरेदी करतात. यामुळे एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तशी भीतीही वाहनचालक आणि नागरिक व्यक्त करीत आहेत. आधीच दिवसेंदिवस रस्ता अपघात वाढत आहेत. एखादी वाईट घटना घडण्याआधीच स्थानिक पंचायत किंवा संबंधित सरकारी यंत्रणेने या विक्रेत्यांविरोधात वेळीच कारवाई करावी, अशी मागणी शैलेश फातर्पेकर आणि अन्य वाहनचालक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

US Iran War: "इराण गुडघ्यावर आलाय!" डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 15 कलमी शांतता योजनेवर लवकरच होणार स्वाक्षरी? VIDEO

VIDEO: बागा बीचवर मृत्यूशी थरार! पॅरासिलिंग सुरु असताना अचानक दोरी तुटली अन्... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Mahika Sharma : हार्दिक पांड्याची गर्लफ्रेंड माहिकानं दाखवलं आईचं रुप! चिमुकल्या अगस्त्यसाठी गर्दीत बनली 'ढाल' Watch Video

SCROLL FOR NEXT