Vasco Water Issuu Meeting Dainik Gomantak
गोवा

Vasco water Issuu : सांकवाळमध्‍ये पाण्‍यासाठी वणवण ; पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मोर्चाचा इशारा

अधिकारी धारेवर : दोन दिवसांची मुदत, अन्‍यथा मोर्चाचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

वास्को : सांकवाळ पंचायत क्षेत्रातील प्रभाग 3 मधील लोकांना गेल्या आठ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्‍याने त्‍यांनी आज बुधवारी बायणा-वास्को येथील सार्वजनिक बांधकाम पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कुठ्ठाळी-सांकवाळ भागातील पाणी उत्तरेतील तिसवाडी, आगशी भागात वळविण्यात येत असल्याने सांकवाळ परिसरात पाण्याची टंचाई भासू लागली असल्‍याचे स्थानिक पंच तुळशीदास नाईक यांनी सांगितले. दरम्‍यान, येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर मोर्चा घेऊन येण्याचा इशारा स्थानिक रहिवाशी प्रदीप नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

गेल्‍या काही दिवसांपासून या लोकांची पाण्‍यासाठी वणवण चालली आहे. त्‍यामुळे त्‍यांनी अनेकदा पाणीपुरवठा विभागातील कुठ्ठाळीचे साहाय्यक अभियंते नरेश पैंगीणकर यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. तरीसुद्धा पाण्याचा थेंबही लोकांना मिळत नसल्याने अखेर त्‍यांनी आज पंचसदस्‍य तुळशीदास नाईक, मंगलदास नाईक, राजू नाईक, संतोष नाईक, रिमा नाईक यांच्‍यासह अभियंते नरेश पैंगीणकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना जाब विचारला. तसेच विविध प्रश्‍‍नांचा भडिमार केला.

त्‍यावर अभियंते पैंगीणकर यांनी सांगितले की, सांकवाळ येथील जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने तसेच त्‍यास विविध ठिकाणी गळती लागल्याने काही भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे. लवकरच जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

दक्षिण गोव्‍यातील पाणी वळविण्‍यात येतेय उत्तर गोव्‍याकडे!

दक्षिण गोव्‍यातील जनतेला पिण्याचे पाणी साळावली धरणातून पुरविले जाते. मात्र हे पाणी चक्क उत्तर गोव्यातील तिसवाडी, आगशी येथे वळविण्यात येत आहे. यामुळे कुठ्ठाळी, सांकवाळ भागातील लोकांना कमी प्रमाणात पाणी मिळते. परिणामी भविष्यात दक्षिण गोव्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण होईल अशी भीती पंचसदस्‍य तुळशीदास नाईक यांनी व्‍यक्त केली.

सांकवाळ येथील जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने तसेच त्‍यास विविध ठिकाणी गळती लागल्याने काही भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे. लवकरच जलवाहिनीला लागलेली गळती दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल.

- नरेश पैंगीणकर, साहाय्यक अभियंते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: रनवे ओलांडून ॲमेझॉनचं बोईंग-767 विमान थेट गाड्यांवर धडकलं; भीषण स्फोटात 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 250 फ्लाइट्सवर परिणाम

Horoscope: अजा एकादशीला जुळून आला अत्यंत शुभ योग! 'या' राशींचे नशीब चमकणार, पैशांची चणचण मिटून करिअरमध्ये येणार मोठी भरारी

Migrants in Goa: गोव्यात 90 टक्के गुन्ह्यांसाठी परप्रांतीय जबाबदार? कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या अभ्यासात नेमकं काय समोर आलं?

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

SCROLL FOR NEXT