Vasco traffic police campaign for better discipline
वास्को: वाहनचालकांमध्ये शिस्त यावी यासाठी वास्को वाहतूक पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात का असेना, येथील जुन्या बसस्थानकावरील बसचालकांमध्ये शिस्त आली असून, बसगाड्या व्यवस्थितपणे उभ्या करण्यात येत आहेत.
येथील काही ठिकाणी बेशिस्तपणे वाहने उभी करण्यात येत असल्याने वाहतुकीची कोंडी होण्याची प्रकार वारंवार घडत आहेत. रस्त्यावरच वाहन उभे करून खरेदीसाठी जाण्याचे प्रकार सर्रासपणे दिसतात. या प्रकरणी त्या वाहनचालकांकडे विचारणा केल्यास त्यांच्याकडून दादागिरीचीभाषा ऐकण्यास मिळते. त्यामुळे इतर वाहनचालक गैरसोय होत असतानाही गप्प राहण्यात धन्यता मानतात.
येथील जुन्या बसस्थानकावर मडगाव तसेच अंतर्गत रस्त्यांवरून वाहतूक करणाऱ्या मिनीबसेस उभ्या राहतात. तथापि, बसचालकांपैकी बऱ्याचजणांमध्ये शिस्तीचा अभाव दिसून येतो. ते कोठेही आणि
कशाही प्रकारे वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. परिणामी काही वेळा वादाचे प्रसंग उद्भवतात.
वास्को वाहतूक पोलिसांनी आता जुन्या बसस्थानकावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तेथे ‘नो पार्किंग’च्या जागेत कार उभ्या करणाऱ्यांना दंड ठोठावण्यात येत आहे. त्यामुळे ती जागा सध्या तरी मोकळी झाली आहे. तीच गोष्ट बसचालकांच्या बाबतीत दिसून येत आहे. त्यांच्यामध्ये काही प्रमाणात शिस्त आली आहे, ज्यामुळे इतर वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र ही स्थिती किती दिवस कायम राहील, हे सांगता येत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.